आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोठी बातमी:मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 40 आमदारांसह अयोध्येला पोहोचले, उपमुख्यमंत्री फडणवीस देखील अयोध्येला जाणार

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्रात सत्तांतरानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपल्या आमदार आणि खासदारांसह अयोध्येला आले आहेत. आज एकनाथ शिंदे शिवसेनेच्या 40 आमदारांसह नुकतेच अयोध्येला पोहोचले आहेत. यावेळी लखनौ विमानतळावर जय श्री रामच्या घोषणांचा आवाज घुमला. ढोलताशांच्या गजरात मुख्यमंत्र्यांचे स्वागत करण्यात आले.

तत्पूर्वी अयोध्येला रवाना होताना मुंबई विमानतळावर शिवसेनेच्या आमदारांचा उत्साह पाहण्यासारखा होता. अनेकांनी यावेळी गतवर्षी अचानकच दौरा रद्द केल्याची खंत व्यक्त केली. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील अयोध्येला जाणार आहेत, अशी माहिती खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लखनौमध्ये पोहचल्यावर माध्यमांशी बोलताना दिली आहे.

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गेल्यावर्षी अयोध्या दौऱ्यावर गेले होते. तेव्हा ऐनवेळी शिवसेनेच्या आमदारांचा अयोध्या दौरा रद्द झाला होता. त्यांना विमानतळावरुन परतावे लागले होते. मात्र आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपल्या सर्व आमदारांना घेऊन विशेष अयोध्या दौरा करत आहेत. त्यांच्या या दौऱ्याची मोठ्या प्रमाणात तयारी देखील करण्यात आलेली आहे.

तत्पूर्वी विमानतळावरुन रामदास कदम म्हणाले, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या हातून चांगले काम व्हावे म्हणून प्रभू रामचंद्रांचा आशीर्वाद घेण्यासाठी आम्ही अयोध्येला जात आहोत. आता चोर कोण ते लवकरच स्पष्ट होईल. लवकरच दूध का दूध आणि पाणी का पाणी होऊन जाईल. तर मंत्री शंभूराज देसाई म्हणाले, मागच्यावर्षी विमानतळावरुन आम्हाला माघारी परतावे लागले होते. त्यामुळे आम्ही मुख्यमंत्र्यांना अयोध्या दौऱ्याबाबत आग्रह केला होता.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या ताफ्यासह रात्री लखनऊमध्ये मुक्काम करतील. त्यानंतर रविवारी दुपारी ते अयोध्येत राम मंदिरातील महाआरतीत सहभागी होतील. शिंदेंच्या या अयोध्या दौऱ्यात शिवसेना आणि भाजप नेतेही सहभागी झाले आहेत. भाजप नेते गिरीश महाजन, संजय कुटे, राम शिंदे हे देखील अयोध्येला रवाना झाले.

विरोधकांची टीका

रावणराज्य चालवणारे अयोध्येला जात आहेत, अशा शब्दांमध्ये आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अयोध्या दौऱ्यावरुन टीका केली आहे. तसेच या महाराष्ट्रात आम्ही पुन्हा रामराज्य आणू, असा टोलाही त्यांनी शिवसेना-भाजप सरकारला लगावला आहे. संजय राऊत यांनीही पाप धुण्यासाठी 40 आमदार अयोध्येला जात असल्याचे म्हटले आहे.

पवारांच्या वक्तव्यातून बोध घ्या

अदानीनी घोटाळा केल्याचे सांगत आंदोलन करणाऱ्या पक्षांनी शरद पवार यांच्या वक्तव्यातून बोध घ्यावा असे मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले. अदानी उद्योग समूहाबाबत विचारलेल्या प्रश्नावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अदानी उद्योगसमूहाची उघडपणे पाठराखण केली होती. आज कल्याण येथे एमसीएचआई- क्रेडाईच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या प्रॉपर्टी एक्स्पो 2023 च्या उद्घाटनासाठी आले असता माध्यमांशी बोलताना शिंदे यांनी हे मत व्यक्त केले.