आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुख्यमंत्री एकनाथ शिंदे केवळ नावापुरते आणि राज्याचा कारभार देवेंद्र फडणवीस चालवत आहेत असा विरोधक आरोप करीत असतानाच आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी चक्क फडणवीसांनाच मुख्यमंत्री करुन टाकले. कोकण महोत्सवात बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा राज्याचे लाडके मुख्यमंत्री असा उल्लेख शिंदे यांनी केला.
सीएम शिंदे बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी माईक ओढला होता. त्यावरुन विरोधकानी रान उठवले होते. त्यानंतर सर्व निर्णयाची माहीती तसेच पत्रकार परिषदेत सीएम शिंदे यांच्यापेक्षा देवेंद्र फडणवीसांचा पुढाकार पाहून फडणवीस हेच कारभार चालवत आहेत असा विरोधक आरोप करीत आहेत. यानंतर सीएम एकनाथ शिंदे यांनी आज बोलताना फडणवीसांना मुख्यमंत्रीच करुन टाकले.
नेमके काय म्हणाले सीएम शिंदे?
सीएम शिंदे म्हणाले, ''नमस्कार, कसा काय असत तुम्ही, कोकण महोत्सवात हजर राहून मका आनंद झालो असा. केसरकर साहेब..बाबा काही चुकीचे नाही ना इकडे, आता तर सर्व लोक दुर्बीण लावून बरोबर बसलेले असतात. स्वराज्यभूमी कोकण महोत्सवाच्या उद्घाटन समारंभासाटी उपस्थित राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस..!'' असा उल्लेख मुख्यमंत्री शिंदे यांनी केला.
यावेळी प्रविण दरेकर, प्रसाद लाड, आमदार कालीदास कोळंबकर, आमदार संजय शिरसाट, कृपाशंकरसिंह, कान्होजी आंग्रे यांचे वंशज रघूजी आंग्रे यांची यावेळी उपस्थिती होती.
कोकणाला आर्थिक समृद्ध करण्यासाठी कोकणभूमीद्वारे उपक्रम राबवले जातात. गत आठवर्षांपासून कोकणभूमी उपक्रम राबवते. मी या कार्यक्रमांना उपस्थित राहीलो आहे. कोकणाचे स्वतःचे वैशिष्ट आहे. जंगल, किनारे, समुद्र, किल्ले हे
कोकणातील माणूस गोड - फडणवीस
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फणस बाहेरून काटेरी आहेत. पण आतला गर गोड असतो तसा कोकणातील माणूस गोड आहे असे वक्तव्य केले. याबाबत पुनरोच्चार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.