आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिंदे गटाला शिवसेनेचे नाव वापरता येणार नाही:भाजप किंवा प्रहारमध्ये विलीन व्हावे लागेल; नीलम गोऱ्हेंनी दिला घटनात्मक तरतुदींचा दाखला

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जर एकनाथ शिंदेंचा गट कोणत्या पक्षात विलीन झाला नाही, तर त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई करण्यात येईल. यामुळे एकनाथ शिंदे गटाला शिवसेना नाव वापरता येणार नाही. शिंदे गटाला भाजप किंवा प्रहारमध्ये विलीन व्हावे लागेल असे नीलम गोऱ्हे यांनी घटनात्मक तरतुदीचा दाखला देत म्हटले आहे. हा राज्य घटनेच्या परिषिष्ठाप्रमाणे तो कायदा असल्याचे त्यांनी म्हटले आहे. निष्ठा महत्त्वाची असते, मी पुन्हा एकदा शिवसेना फुलवण्यासाठी प्रयत्न करतो.ज्यांना माझ्यासोबत रहायचे आहे, त्यांनी रहावे ज्यांना जायचे त्यांनी जावे असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी प्रमुख नेत्यांशी बोलताना सांगितले अशी माहिती नीलम गोऱ्हे यांनी दिली.

मुळ पक्षांचे नाव हे शिंदे गटाला वापरता येत नाही. त्यामुळे ते सर्व आमदारांना प्रहार किंवा भाजपमध्ये प्रवेश करावा लागेल. महाराष्ट्रात गैरसमज पसरवल्या जात आहे, की शिवसेना नाव हे शिंदे गटाला मिळणार यावर स्पष्टीकरण देत नीलम गोऱ्हे यांनी दिले आहे. निवडणूक आयोगाचा जो नियम आहे. त्यावर निर्णय घेण्यात येईल. शिवसेनेची एक राज्यघटना आहे. त्यानुसार शिवसेनेची ही राज्यघटना आहे ती कायदेशीर प्रकिया पार पाडावी लागेल.

जर एकनाथ शिंदेंनी प्रहार किंवा भाजपमध्ये आपला गट विलीन केला, तर त्यांनी खांद्यावरून शिवसेनेचा भगवा उतरवला असे म्हणावे लागेल. असे म्हणत त्यांनी बंडखोर एकनाथ शिंदेंना टोला लगावला आहे.

बातम्या आणखी आहेत...