आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आदित्य ठाकरेंना शिंदे गटाचे आव्हान:काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांचे फोटो लावून निवडणूक लढवून दाखवा, आम्हाला हिंदुत्व शिकवू नका

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • =

आम्हाला राजीनामा देऊन निवडणूक लढण्याचे आव्हान दिले जातेय. मात्र, तुम्हीच काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचे फोटो लावून निवडणूक लढवून दाखवा, असे आव्हान शिंदे गटाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी शिवसेना नेते आदित्य ठाकरेंना दिले आहे.

युतीच्या बळावरच विजयी

शीतल म्हात्रे म्हणाल्या, 2019च्या विधानसभा निवडणुकीत आपण हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो लावून जनतेला मते मागितली. त्यामुळे आपल्या आमदार होण्यामध्ये भाजपचीही काही मते आहेत. तरीदेखील आपण आमदार झाल्यानंतर ज्या युतीच्या बळावर निवडून आलात, ती युतीच तोडली व महाविकास आघाडी स्थापन केली. खरी गद्दारी हीच होती.

बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी केली

शीतल म्हात्रे म्हणाल्या, आपण मविआ स्थापून सत्तेत आलात. त्यामुळे जनतेचा विश्वासघात, जनतेच्या पाठित कुणी खंजीर खुपसला तर तो तुम्हीच. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससोबत जात तुम्हीच बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांशी गद्दारी केली. आम्ही बाळासाहेबांचे विचार घेऊनच पुढे जात आहोत. आम्हाला राजीनामा देऊन पुन्हा निवडणूक जिंकण्याचे आव्हान देण्यापूर्वी आपण राजीनामा द्यावा व काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचे फोटो लावू निवडणूक जिंकून दाखवावी, असे आव्हान म्हात्रे यांनी दिले.

तेव्हा हिंदुत्व कळेल

शीतल म्हात्रे म्हणाल्या, गेल्या अनेक दिवसांपासून गद्दार, विश्वासघात, पाठित खंजीर खुपसला असे शब्द आम्ही तुमच्या तोंडून ऐकतोय. खरे तर या विषयावर आम्ही बोलणार नव्हतो. मात्र, सातत्याने आरोप होत असल्याने आता बोलणे भाग आहे. मुळात गद्दार, पाठित खंजीर खुपसणे, या शब्दांचा अर्थ तुम्ही पाहिल्यास बरे होईल. निवडणुकीत तुम्ही काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्याचे फोटो लावाल व जनतेपुढे जाल, तेव्हा तुम्हाल हिंदुत्व म्हणजे काय हे कळेल. आम्हाला हिंदुत्व शिकवू नका, असेदेखील म्हात्रे यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...