आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी आपल्यासमोर निवडणूक लढून दाखवण्याचे आव्हान दिले होते. त्यांच्या आव्हानाला शिंदे गटाने जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. तु्म्हाला जर धमकावायची इच्छा आहे. तुमचा पराभव व्हावा जर तुमची हीच इच्छा असेल, तर आमच्यासारखे शिवसैनिक तुमच्या विरोधात निवडणूक लढण्यास तयार आहेत. त्यासाठी मुख्यमंत्री शिंदे यांना मैदानात उतरण्याची गरज नाही. असे सडेतोड उत्तर 'बाळासाहेबांची शिवसेने'च्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी दिले आहे.
आदित्य ठाकरे तुम्हाला आव्हान देण्याची गरज नाही. कारण मुख्यमंत्री शिंदे यांचे आमच्यासारखे कट्टर शिवसैनिक तुमच्या विरोधात लढण्यास तयार आहे. जेव्हा तुम्ही वरळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत होता तेव्हा तुम्हाला 6000 पेक्षा जास्त नोटा मते मिळाली होती. मात्र आज वरळीतील जनतेला आपल्या स्थानिक आमदाराला भेटायचे असेल तर एकही जनसंपर्क कार्यालय नाही. असा जोरदार हल्ला म्हात्रे यांनी आदित्य ठाकरेंवर केला आहे.
वरळी विधानसभा मतदारसंघातून तुम्हाला (आदित्य ठाकरे) निवडून आणण्यासाठी तिथून दोन जणांना आमदार करावे लागले. वरळी मतदारसंघातून तीन आमदार आहेत. असे असतानाही संतोष खरात यांच्यासारख्या माजी नगरसेवकांनी शिवसेना (ठाकरे गट) सोडून मुख्यमंत्री शिंदे यांच्या 'बाळासाहेबांची शिवसेने'च्या पक्षात प्रवेश केला आहे.
आदित्य ठाकरेंचे वक्तव्य काय?
युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर जोरदार टीकास्त्र डागले आहे. मी माझ्या मतदारसंघातून राजीमाना देतो. माझ्याविरोधात निवडणूक लढवा. तुम्ही कसे निवडून येतात ते मी बघतो, असे आदित्य ठाकरे म्हणाले आहेत. ते एका जाहीर सभेत बोलत होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.