आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुख्यमंत्री असो की, सामान्य...प्रत्येकाचे नाते सारखेच अन् ऋणानुबंधाचा धागाही तितकाच पक्का. प्रत्येक आजोबासाठी आपला नातू जीव की, प्राण. मग त्याचा हट्ट पुरवण्यासाठी आजोबा वाट्टेल ते करणारच. अशाच आपल्या नातवाच्या हट्टापायी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे थेट दुकानात पोहचले. खासदार मुलगा श्रीकांत शिंदे यांच्यासह नातवाला घेवून त्यांनी दुकानात चेंडूची खरेदी केली. हा प्रकार अनेकांनी कॅमेऱ्यात कैद केला तर अनेकजण हा प्रसंग पाहताना भावविभोर झाले.
निमित्त होते होळीच्या सणाचे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे होळीचा सण साजरा करायला ठाण्यातल्या आपल्या निवासस्थानी आले होते. होलिका दहन झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्याकडे मुलाने चेंडू घेण्याचा हट्ट केला.
नातवाचा हट्ट न पुरवणार ते आजोबा कसले. मोठ्या प्रमाणे मुख्यमंत्री शिंदे यांनी नातू रूद्रांशला घेऊन दुकानात पोहचले. सोबत खासदार श्रीकांत शिंदेही मुख्यमंत्र्यांसोबत होते. दुकानात त्यांनी नातवाला चेंडू घेऊन दिला. तत्पूर्वी मुख्यमंत्री शिंदे दुकानात काय करीत आहेत हे पाहण्यासाठी गर्दी तेथे जमली.
एकनाथ शिंदे नातवाला घेऊन दुकानात काय खरेदी करण्यासाठी आले ते पाहण्यासाठी आलेल्यांनी आपला कॅमेरा काढून या प्रसंगाचे चित्रिकरण केले. त्यानंतर हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतो आहे.
CM शिंदेंचा नातवासोबतचा व्हिडिओ व्हायरल
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे किसननगर येथे लहानाचे मोठे झाले. होळीनिमित्त ते काल तेथे गेले होते. तेथे त्यांचा नातू रुद्रांशही सोबत होता. होळीचे दहन झाल्यानंतर रुद्रांशने आजोबांकडे दुकानातून काही तरी घेऊन द्या असा हट्ट धरला, त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्याला घेऊन दुकानात पोहचले आणि त्याला चेंडू घेऊन दिला. हा व्हिडिओ सोशल माध्यमात व्हायरल होत आहे.
पाहा सीएम शिंदे आणि फॅमिलीचे खास फोटोज्
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.