आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पक्षातील असंतोष म्हणजे फूट नाही:शिंदे गटाचे वकील नीरज कौल यांचा सर्वोच्च न्यायालयात दावा; म्हणाले - महाविकास आघाडीला होता विरोध

नवी दिल्ली22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पक्षातील असंतोष म्हणजे फूट नाही, असा दावा बुधवारी सुरू झालेल्या सुनावणी शिंदे गटाचे वकील नीरज कौल यांनी सर्वोच्च न्यायालयात केला. त्यांनी विधानसभा अध्यक्षांचे अधिकार, मुख्य प्रतोद कोण, प्रतोदाचे अधिकार, विधिमंडळ गट आणि राजकीय पक्ष यांच्यातील फरक व साम्य या विषयावर युक्तिवाद केला.

शिंदे गटाच्या आमदारांच्या जीवाला धोका होता. ते महाराष्ट्रात सुरक्षित नव्हते. त्यामुळे ते राज्याबाहेर गेले होते, असा दावा त्यांनी यावेळी केला. सध्या महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाची सुनावणी अंतिम टप्प्यात आली असून, या महिन्यात यावर निर्णय येण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर आज सुरू झालेल्या सुनावणीत शिंदे गटाचे वकील नीरज कौल यांनी बाजी मांडली. ते म्हणाले की, शिंदे गटाच्या आमदारांच्या जीवाला धोका होता. त्यांची घरे जाळण्याची धमकी देण्यात आली. ते सुरक्षित नव्हते. त्यामुळे ते राज्याबाहेर गेले. अपात्रतेसंदर्भात त्यांना एकही नोटीस देण्यात आली नाही.

युक्तिवाद करताना नीरज कौल पुढे म्हणाले की, पक्षातील असंतोष म्हणजे फूट नव्हे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची विचारधारा वेगळी आहे. त्यामुळे आम्ही वेगळे होण्याचा निर्णय घेतला. शिवसेनेत कधीही असंतोष नव्हता. आमचा महाविकास आघाडीला विरोध होता. आम्हीच शिवसेना आहोत. आम्हाला तशी मान्यता मिळाली आहे, असा दावा त्यांनी केला.

कोणताही मुख्यमंत्री बहुमत चाचणीवर स्थगिती आणण्याची मागणी कशी करू शकतो? राज्यपालांनी आणखीन काय करायला हवे होते, असा सवाल शिंदे गटाचे वकील नीरज कौल यांनी केला. शिवाय राज्यपालांचे सरकारकडे बहुमत आहे की नाही एवढे एकच म्हणणे होते. बहुमत चाचणीवर स्थगिती आणावी, अशी मागणी करणारी याचिका 29 जून रोजी सुनील प्रभू दाखल केली. त्यासाठी प्रभू यांनी अपात्रतेची कारवाई प्रलंबित असल्याचे कारण दिल्याचे त्यांनी सांगितले.

संबंधित वृत्तः

मुख्यमंत्री बहुमत चाचणी नको, कसे म्हणतात?:शिंदे गटाच्या वकिलाचा सवाल; विधानसभा अध्यक्षांच्या गुंत्यावर सरन्यायाधीशांचे बोट

बातम्या आणखी आहेत...