आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आमचे मुख्यमंत्री सक्षम:..तर आम्ही स्वत:च्या जीवावर निवडणुका लढवू; शिंदे गटाचे नेते आनंदराव अडसूळ यांचे मोठे विधान

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जर भाजपसोबत गेला तर आम्ही स्वत:च्या बळावर निवडणुका लढवू शकतो असे विधान शिंदे गटाचे नेते आनंदराव अडसूळ यांनी केले आहे. गोव्यामध्ये माध्यमांशी बोलत असताना हे मोठे विधान केले आहे.

अडसूळ नेमके काय म्हणाले?

शिंदे गटाचे नेते आनंदराव अडसूळ म्हणाले की, भाजपा आम्हाला तुम्ही सोबत येऊ नका असे म्हणेल असे वाटत नाही आणि म्हणाले तरी आम्हाला काही फरक पडत नाही. आमचा मुख्यमंत्री इतका सक्षम आहे, की आम्ही स्वबळावर निवडणुका लढवू शकतो. आनंदराव अडसूळ यांच्या वक्तव्याने राज्याच्या राजकारणात शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मतभेद आहेत की काय असा सवाल उपस्थित होताना दिसून येत आहे.

पवारांच्या भूमिकेमुळे राजकारण तापले

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा खासदार शरद पवार यांनी उद्धव ठाकरेंनी राजीनामा देताना मविआतील मित्रपक्षांना विचारात घेतले नाही. त्यांनी स्वत: निर्णय घेतला. तर शरद पवारांनी अदानीवरुन घेतलेल्या भूमिकेवर मविआमध्ये मतभेद असल्याच्या चर्चा सुरू आहेत. यात शरद पवारांनी नागालॅंडमध्ये भाजप सरकारला दिलेला पाठिंबा, यावरुण राज्यात भाजप- राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याच्या चर्चांना उधान आले आहे. यावर माध्यमांच्या प्रश्नांना उत्तर देताना शिवसेनेचे नेते आनंदराव अडसूळ यांनी हे वक्तव्य केले आहे.

आनंदराव अडसूळ नेमके कोण?

शिंदे गटाचे नेते आनंदराव अडसूळ यांनी 2009 ते 2019 अशी 10 वर्षे अमरावती लोकसभा मतदारसंघाचे नेतृत्व केले आहे. शिवसेनेच्या नेतेपदाची त्यांच्यावर जबाबदारी देण्यात आली होती. मात्र, 2019 ला नवनीत राणा यांनी त्यांचा लोकसभा निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्याने पराभव केला. यानंतर त्यांच्यावर ईडीकडून कारवाई करण्यात आली आहे. ते ईडीच्या चौकशीच्याही फेऱ्यात अडकल्यानंतर त्यांनी शिवसेनेतील नेते पदाचा राजीनामा देत एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व स्वीकारले आहे.