आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अवकाळीचे संकट:युद्धपातळीवर पंचनामे करा, CM एकनाथ शिंदेंचे आदेश; पावसामुळे झालेल्या नुकसानीचा आज घेणार आढावा

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यातील अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानाचा आणि त्याबाबत उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज बैठक घेणार आहेत. सह्याद्री अतिथीगृहावर ही बैठक होणार आहे.

महाराष्ट्रात पुन्हा एकदा अवकाळीचे संकट आले आहे. राज्यात अनेक भागात अवकाळी पाऊस झाल्याने मका, हरभरा, गहू, केळी, मिरची आदी पिकांचे नुकसान झाले आहे. पिके पाण्यात गेल्याने शेतकरी त्रस्त आहे.

पंचनामे युद्धपातळीवर करा

राज्यातील अवकाळी पावसाच्या नुकसानावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांच्या आयोध्या दौऱ्याला टार्गेट केल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी विरोधकांच्या टीकेला प्रत्यूत्तर देत अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानाचे पंचनामे युद्धपातळीवर करा, असे आदेश आयोध्येतूनच दिले असल्याचे त्यांनी सांगितले.

काय म्हणाले मुख्यमंत्री?

अयोध्यावरून परतल्यावर मुख्यमंत्री म्हणाले की, अवकाळीमुळे झालेल्या नुकसानीबाबत मी मुख्य सचिव आणि संबंधित जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्कात असून पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या आहेत. काही ठिकाणी कलेक्टर स्वतः गेलेले आहेत आणि शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी असून त्यांना वाऱ्यावर सोडणार नाही.

अवकाळीचा फटका कुठे?

नाशिक जिल्ह्यातील देवळा, नांदगाव, निफाड, सिन्नर, कळवण, ईगतपुरी, चांदवड, दिंडोरी या तालुक्यात अवकाळी पावसामुळे मोठे नुकसान झाले. या गारपिटीमध्ये कांदा, द्राक्ष, गहू, आंबा, भाजीपाल्यासह अनेक पिकांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले. पुण्यातही मुसळधार पावसासह काही भागात गारपीट झाली. तर तिकडे वाशिम जिल्ह्यातील मंगरूळपीर तालुक्याला अवकाळी पावसाने अक्षरश: झोडपून काढले आहे.

बीडला पावसाने झोडपले

फेब्रुवारी-मार्च महिन्यातील नुकसान भरपाईसाठी पंचनामे पूर्ण झालेले नसतानाच दोन दिवसांत अवकाळी पाऊस, गारपिटीने जिल्ह्यात 2 हजार 762 हेक्टर क्षेत्र बाधित झाले. 4 हजार 327 शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल जिल्हा प्रशासनाने दिला आहे.