आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवसेनेचे 13 आमदार नॉट रिचेबल:एकनाथ शिंदे दुपारी सूरतमध्ये घेणार प्रेस; ठाकरेंनी बोलावली तातडीची बैठक

मुंबई8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दुपारी 12 वाजता शिवसेनेची बैठक बोलावली आहे. तत्पुर्वी शिवसेनेचे महत्वाचे नेते आणि महाविकास आघाडीतील नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे हे सोमवार संध्याकाळपासून नाराज असून ते नॉट रिचेबल आहेत. एकनाथ शिंदे हे सध्या गुजरातमध्ये असून ते आज दुपारी 12 वाजता सुरतमध्ये पत्रकार परिषद घेणार आहेत.

राज्य सभा पाठोपाठ विधान परिषदेतही शिवसेनेच आमदार फुटले शिवसेनेच्या अनेक मंत्र्यात सध्या नाराजी नाट्य सुरू आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दुपारी 12 वाजता शिवसेनेच्या सर्व आमदारांची बैठक बोलावली आहे. तर तिकडे नॉट रिचेबल असलेले एकनाथ शिंदे हे सुरतमध्ये आज दुपारी 12 वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत.

हे आमदार नॉट रिचेबल

एकनाथ शिंदे हे काल संध्याकाळपासून नॉट रिचेबल असून, शिवसेनेचे आणखी 13 आमदार देखील नॉट रिचेबल आहेत. त्यामध्ये मराठवाड्यातील संदीपान भुमरे, संजय शिरसाट, रमेश बोरनारे, उदयसिंह राजपूत, ज्ञानेश्वर चौगुलेंह इतर आमदार नॉट रिचेबल आहेत.

संजय राऊतांचा दिल्ली दौरा रद्द

शिवसेना खासदार संजय राऊत हे आज दिल्लीला जाणार होते मात्र, एकनाथ शिंदे नाराज असल्याने तसेच आज शिवसेनेच्या आमदारांची बैठक असल्याने त्यांनी आपला दिल्ली दौरा रद्द केला आहे. त्यासोबत मंत्री उदय सामंत यांचा देखील रत्नागिरी दौरा रद्द झाला असून, सामंत आणि राऊत आज मुंबईतच थांबणार आहेत.

बातम्या आणखी आहेत...