आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुम्ही घटनाबाह्य विरोधी पक्षनेते आहात का?:शिंदे यांचा पवारांना सवाल; म्हणाले - तुमच्या पोटदुखीवर आमच्याकडे जालीम औषध

मुंबई23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आम्हाला महाराष्ट्र द्रोही म्हणता. आमचे सरकार घटनाबाह्य म्हणता. मग तुम्ही घटनाबाह्य विरोधी पक्षनेते आहात का, असा सवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत विरोधी पक्षनेते अजित पवार यांना विचारला. घटनाबाह्य सरकारच्या जाहिराती, सगळ्या सुविधा तुम्हाला चालतात, हे कसे, असे म्हणत उद्धव ठाकरे यांना चिमटा काढला. (मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे संपूर्ण भाषण ऐकण्यासाठी येथे क्लिक करा)

अजित पवारांच्या यांच्याकडून अशा वक्तव्याची अपेक्षा नव्हती, असेही एकनाथ शिंदे म्हणाले. मी तुम्हाला देशद्रोही म्हणालो नाही. मात्र, नवाब मलिकांचा उल्लेख केला. ज्याने मुंबई बॉम्बस्फोट घडवले. त्या दाऊदच्या माणसांशी हसिना पारकर यांच्यासोबत त्यांनी व्यवहार केला. मात्र, तुम्ही त्यांचा राजीनामा न घेता पाठिशी घातले, याची आठवणही त्यांनी करून दिली.

जयंतरावांवर अन्याय केला

तुम्ही घटनाबाह्य विरोधी पक्षनेते आहात काय, असा सवाल एकनाथ शिंदे यांनी अजित पवार यांना विचारला. तसेच तुम्ही जयंतरावांवर अन्याय करून आले. त्यांची विरोधी पक्षनेता व्हायची इच्छा होती. होती की नाही, असा सवाल त्यांनी जयंत पाटील यांच्याकडे पाहून केला आणि सभागृहात एकच खसखस पिकली. शिंदे म्हणाले, पोटदुखीचे असे प्रसंग वारंवार येतील. त्यासाठी जालीम उपाय शोधून ठेवला आहे. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना त्यासाठीच आहे, असा टोला त्यांनी हाणला.

पवार शिवसेनेचे प्रवक्ते

अजित पवार शिवसेनेचे एवढे प्रवक्ते झाले आहेत की, त्यांना फक्त पद द्यायचे बाकी आहे. त्यांना सहशिवसेना प्रमुखपद देऊ शकत नाही. कारण शिवसेना आमच्याकडे आहे, असा चिमटाही त्यांनी काढला. शिंदे पुढे म्हणाले की, अजित दादा एवढे कडवट कट्टर शिवसैनिक बनू नका. बाकी लोकांना जागा ठेवा, असा टोला हाणताच पुन्हा एकदा

सोन्यासारखी माणसे येतात

अजित दादा म्हणाले, चहापानावर २ कोटी ४० लाखांचा खर्च झाला. मला सांगा अडीच वर्ष वर्षा बंद होता. तिकडे जायला कोविड टेस्ट करावी लागायची. तुम्ही म्हणालात सोन्याचे पाणी टाकतात का? दादा राज्यभरातून माझ्याकडे सोन्यासारखी माणसे येतात. त्यांना चहापाणी पाजू नको? आपण म्हणाले जाहिरातीवर खर्च करता. तुम्ही जाहितीसाठी दोनशे - अडचशे कोटी ठेवले होते. सहा कोटी तुमचे पर्सनल पीआर होते. बोंबाबोंब झाल्यावर हे मागे घेतले याची आठवणही शिंदे यांनी करून दिली.

बातम्या आणखी आहेत...