आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअजित दादा तुम्ही सिंचनावर 70 हजार कोटी रुपये खर्च केले. मात्र, एक टक्काही सिंचन क्षेत्र वाढवू शकले नाही. पृथ्वीराज बाबांना ही कन्विन्स करू शकले नाही. मात्र, आम्ही सिंचन प्रकल्पातून 38 हजार कोटींत पाच लाख हेक्टर जमीन सिंचनखाली आणणार आहोत. लोकशाहीत कुठलेही चुकीचे काम करणार नाही. केलेले नाही, असा निर्धार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. (मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे संपूर्ण भाषण ऐकण्यासाठी येथे क्लिक करा)
शिंदे यांनी यावेळी भाजप-शिवसेना सरकारने सुरू केलेल्या कामांची यादीच फडाफडा वाचून दाखवली. यावेळीही त्यांनी उद्धव ठाकरे यांना टोला हाणायची आणि अजित पवारांना शाब्दिक चिमटा काढायची एकही संधी सोडली नाही.
उद्धव ठाकरेंना टोला
शिंदे म्हणाले, कोरोना काळात देशात महाराष्ट्राचे नाव घेतले. जागतिक आरोग्य संघटनेने कौतुक केले. पण कीट घालून दवाखान्यात जायचो. आम्हाला दोनदा करोना झाला. टोपेजींनी मेहनत घेतली. आम्ही डिस्टन्स एज्युकेशन समजू शकतो. मात्र, डिस्टन्स अॅडिमिनीस्ट्रेशन पहिल्यांदा पाहायला मिळाले, असे म्हणत त्यांनी ठाकरेंना टोला हाणला. त्यांची माझे कुटुंब, माझे जबाबदारी एवढीच होती. आता आमचा महाराष्ट्र गतिमान महाराष्ट्र आहे.
आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक
एकनाथ शिंदे म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासाठी नवीन कमिटी नेमली आहे. जगाला हेवा वाटेल असे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक उभारू. शिवाजी महाराजांचे स्मारकी उभारू. मात्र, ते प्रकरण सर्वोच्च न्यायालयात आहे. पाडवा आणि आंबेडकर जयंतीला आनंदाचा शिक्षा देणार असल्याचे सांगितले.
तर निधी कसा मिळेल?
एकनाथ शिंदे म्हणाले, आमदार निवास असे बांधत आहेत. त्या समितीत विरोधी पक्षनेते आहेत. त्यांनी सक्रिय भाग घ्यावा. मात्र, तुम्ही पत्रावर सही करत नाही. बिना सहीचे पत्र देता. तेव्हा आम्ही धरून टाकतो की, अजित दादांचे पत्र आहे. तुम्ही असे निर्णय घेतले टोपेसाहेब. बहुतेक आता आपण जातो आहो याची माहिती होती. त्यामुळे २ हजार कोटींच्या जागी ७ हजार कोटींची तरतूद करून सह्या केल्या. मात्र, आता आमच्या खर्चावर प्रश्न उपस्थित करता. तुम्ही चहा पाण्याचा विषय काढायलात तर निधी कसा मिळेल, असा टोला हाणला.
साखर उद्योगाला दिलासा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी कामांची यादीच फडाफडा वाचून दाखवली. ते म्हणाले, काही लोकांच्या स्थगिती उठवल्या. एसटी कर्मचाऱ्यांचा विषय हाती घेतला. एसटी स्थगिती उठवतोय. केंद्र सरकारच्या मदतीने रेल्वे, रस्त्यांचे प्रलंबित विषय सोडवत आहे. सहकार क्षेत्राच्या प्रश्नासाठी गृहमंत्री , सहकारमंत्र्यांकडे गेलो. साखर उद्योग अडचणीत आहे. दहा हजार कोटींचा दिलासा देण्याचा निर्णय अमित शहांनी घेतला. सहकार क्षेत्र मजबूत आणि अधिक सुदृढ करणार असल्याचे ते म्हणाले.
पुण्यात रिंग रोड
राज्य सरकारच्या माध्यमातून पायाभूत सुविधेचे प्रकल्प पुढे नेतोय. नागपूर ते गोवा, मुंबई, सिंधुदुर्ग ग्रीन फिल्ड हायवे, मुंबई - गोवा कोस्टल हायवे करतो आहे. अजित पवारांचा जिव्हाळ्याचा पुणे रिंगरोड, ठाण्यात बायपास, भिवंडी आठ लेन आणि कोकण क्षेत्र नियोजन प्राधिकरणामधून काम सुरू केल्याचे त्यांनी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.