आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी स्वतः मी ट्विट केले नाही. माझ्या नावाने फेक ट्विटर अकाऊंट आहे हे सांगितले. त्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनीही हेच सांगितले. त्यामुळे मला त्या वादात जायचे नाही, राजकारण करायचे नाही, अशी भूमिका राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली आहे.
राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मईंच्या ट्विटरबाबतच्या भूमिकेवर बोट ठेवले. त्याशिवाय यावरुन आता टीका होत आहे. त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रीया दिली. मुंबईत आज एका प्रकल्पाचे उद्गघाटन केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते.
पहिल्यांदाच गृहमंत्र्यांचा हस्तक्षेप
एकनाथ शिंदे म्हणाले, मी काल अमित शहांसोबत बैठकीत होतो. केंद्रीय गृहमंत्र्यांनी पहिल्यांदाच सीमावादात हस्तक्षेप केला. एवढे सरकार आले आणि गेले पण सीमावादावर कुणी काहीही हस्तक्षेप केंद्र स्तरावर केला नव्हता. सुप्रीम कोर्टात प्रकरण न्यायप्रविष्ठ असून मराठी माणसांवर अन्याय होऊ नये अशी आमची ठाम भूमिका तेथे मांडली.
विरोधकांना काहीही बोलू द्या
एकनाथ शिंदे म्हणाले, कर्नाटक सरकारसोबतच महाराष्ट्रातील विरोधी पक्षांनाही अमित शहा यांनी हा मुद्दा सामंजस्याने घ्यावा असे सांगितले आहे. विरोधकांना जे बोलायचे ते आता त्यांना बोलू द्या. अमित शहांनी सूचना दिल्या आहेत.
CM बोम्मईंना आम्ही स्वतः बोललो
एकनाथ शिंदे म्हणाले, सीएम बसवराज बोम्मईंना आम्ही स्वतः बोललो. त्यांच्या ट्विटमुळे समज - गैरसमज होतोय असे आम्ही त्यांना म्हटले. त्यांनी यावर मी काहीही गैरसमज निर्माण केला नाही. माझे फेक ट्विटर अकाऊंट आहे असे ते म्हणाले. त्यावर ते कारवाई करणार आहेत.
एकनाथ शिंदे म्हणाले, केंद्रीय गृहमंत्र्यांनी स्वतः सांगितले, बोम्मईंनी स्वतः सांगितले मला त्या वादात जायचे नाही. आम्हाला यातून सामंजस्यपणाने तोडगा काढायचा आहे. राजकारण करायचे नाही. आमचे काम समृद्धी हायवेसारखे वेगवान आहे. आमचे निर्णयही वेगवान आहेत.
स्थानिकांवर अन्याय होणार नाही
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, जेथे प्रकल्प राबवतो तिथे विकासात जे लोक येतात त्यांच्यावर अन्याय होता कामा नये. ही आमची भूमिका आहे आणि बाळासाहेब ठाकरे यांचीही भूमिका होती. कोळी बांधव आणि मनपा यांच्यातील वाद मिटला असून कोळीवाड्यातील भूमिपूत्रांची मागणी मान्य झाली. मनपा आयुक्त इकबाल चहल यांनीही तोडगा काढला. 120 मीटरचा स्पॅम करण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.