आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकसबा आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक टाळण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः आपल्या हातात कमान घेतली आहे. निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, अजित पवार, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना फोन केल्याची माहिती समोर आली आहे. शिंदे येणाऱ्या 2 दिवसात उद्धव ठाकरे यांना देखील फोन करु शकतात. असे म्हटले जात आहे.
बहुचर्चित ठरणाऱ्या कसबा पेठ आणि चिंचवड पोटनिवडणुकीसाठी भाजपने शनिवारी सकाळी उमेदवार जाहीर केले. कसबा पेठ येथून अपेक्षेप्रमाणे हेमंत रासने यांना तिकीट देण्यात आले, तर चिंचवडमध्ये लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. मात्र रासणे यांच्या नावाला हिंदू महासभेने विरोध केला आहे. आनंद दवे यांनी उमेदवारी अर्ज भरणार असल्याचे सांगितले.
यांना केले फोन
मुख्यमंत्री कार्यालयातून देण्यात आलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रवादीचे सर्वसर्वा शरद पवार, विरोधी पक्षनेते अजित पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांना फोन केले आहेत.
परंपरा विरोधी पक्षाने जपावी
एखाद्या मतदारसंघात लोकप्रतिनिधींचे निधन झाल्यास त्या मतदारसंघात उमेदवार न देण्याची महाराष्ट्राची परंपरा आहे. ही परंपरा विरोधी पक्षाने जपावी असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे. आता त्यांच्या या आवाहनाला कसा प्रतिसाद मिळतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
शिंदे यांनी आमच्याकडे संपर्क केला नाही
त्याचप्रमाणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन करु शकतात. शिंदे हे येत्या दोन दिवसात उद्धव ठाकरे यांना फोन करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र संजय राऊत यांना याबाबत विचारले असता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमच्याकडे संपर्क केला नाही. असे त्यांनी म्हटले आहे.
फडणवीसही करणार फोन
दरम्यान, कसबा आणि चिंचवडसाठी अर्ज भरण्यासाठी 7 फेब्रुवारी हा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील विरोधी पक्षाच्या नेत्यांना फोन करून या निवडणुकीत उमेदवार न देण्याचे आवाहन करणार आहेत.
संबंधित वृत्त
राज ठाकरेंचे मविआ नेत्यांना पत्र
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा पत्र लिहित पिंपरी-चिंचवड आणि कसबा विधानसभेच्या पोटनिवडणूका बिनविरोध व्हाव्यात, अशी इच्छा व्यक्त केली आहे. वाचा सविस्तर
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.