आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आले आहे. त्यामुळे विधीमंडळात गोंधळ झाला यावर बोलताना कांदा उत्पादकांना 300 रुपये प्रतिक्विंटल सानुग्रह अनुदान मिळणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, खरीप हंगामातील लाल कांद्याची आवक मोठ्या प्रमाणावर आहे. देशातील इतर राज्यातील कांद्याचे उत्पादन वाढल्याने पुरवठ्याच्या प्रमाणात मागणी कमी आहे. त्यामुळे कांद्याच्या दरामध्ये घसरण झाली आहे. कांदा नाशवंत पीक असल्याने त्याला किमान आधारभूत किंमत लागू करता येत नाही. कांदा हे महाराष्ट्रातील महत्त्वाचे नगदी पीक असून त्याला मिळणारा भाव कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील जिव्हाळ्याचा भाग आहे.
गेल्या दोन महिन्यांपासून कांद्याच्या भावात मोठी घसरण होत असून कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे.या विरोधात राज्यातील शेतकऱ्यांकडून अनेक ठिकाणी आंदोलने सुरू आहेत. तर नाशिकमधून किसान मोर्चा मुंबईकडे रवाना झाला आहे.
भुजबळांची सत्तारांवर टीका
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या वक्तव्यावरुन जोरदार हल्लाबोल केला आहे. सत्तार हे असंवेदनशील मंत्री आहेत, ते शेतकऱ्यांच्या आत्महत्येबद्दल जे वक्तव्य करताय. अवकाळी पाऊसामुळे झालेल्या नुकसानीची शेतकऱ्यांना मदत मिळाली नाहीये, तर दुसरीकडे सत्तार म्हणतात की शेतकऱ्यांच्या आत्महत्या या रोजच्या आहेत. त्यात नवे काय हे संवेदना हीन कृषीमंत्री आहेत असा टोला भुजबळांनी लगावला आहे.
भुजबळ पुढे बोलताना म्हणाले की, कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कांदा पिकासाठी 1200 रुपये खर्च येत आहे. मात्र कांद्याला आज 500 रुपये तर जास्तीत जास्त 700 रुपये भाव मिळत आहे ही सद्याची परिस्थिती आहे. मात्र कांदा उत्पादक शेतकऱ्यांना शासनाने केवळ 300 रुपये मदत जाहीर केली आहे. ही मदत तुटपुंजी असून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना किमान 500 रुपये अनुदान देण्यात यावे मात्र सरकार 300 रुपयांवर ठाम राहिल्याने सभात्याग करण्यात आला.
लाल वादळ विधान भवनावर धडकणार
दिंडोरी येथील नवीन कांदा मार्केट पासून मोर्च्यास सुरुवात करण्यात आली, येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मोर्च्यांचे स्वागत तालुकाध्यक्ष अप्पा वाटणे, देविदास वाघ यांनी केले, यावेळी रस्ता अडवत रस्त्यावर कांदे फेकत शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली, माजी आमदार कॉम्रेड जीवा पांडू गावित यांचे नेतृत्वाखाली या प्रलंबीत मागण्या सोडण्यासाठी दिनांक 12 मार्च 23 पासून दिंडोरी ते मुंबई असा शेतकऱ्यांचा पायी लॉंग मार्च आयोजित करण्यात आला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.