आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करास्वातंत्र्यवीर सावरकरांविरोधात यापुढे एक शब्दही सहन करणार नाही. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान खपवून घेणार नाही, असा इशारा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला आहे.
ठाणे येथे शिसवेना व भाजपतर्फे आयोजित सावरकर गौरव यात्रेत एकनाथ शिंदे सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
सावरकरांचा अवमान सहन करणार नाही
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, सावरकरांचा वारंवार अवमान करणाऱ्यांना सावरकर गौरव यात्रेतून सडेतोड प्रत्युत्तर दिले जात आहे. सावरकर गौरव यात्रा ही तर केवळ एक छोटीशी झलक आहे. यापुढे आम्ही सावरकरांचा अवमान सहन करणार नाही. सावरकरांवर बोलताना नेत्यांनी विचारपूर्वक बोलले पाहीजे. सावरकरांच्या गौरव यात्रेतून त्यांचे ज्वलंत हिंदुत्वाचे विचार घरोघर पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे.
राहुल गांधींनी माफी मागावी- आशिष शेलार
दादरमध्येही शिवसेना व भाजपकडून सावरकर गौरव यात्रा काढण्यात आली. भाजप नेते आशिष शेलार या यात्रेत सहभागी झाली आहे. यावेळी आशिष शेलार म्हणाले की, राहुल गांधींनी सावरकरांविरोधात जे वक्तव्य केले आहे, त्याबद्दल त्यांनी माफी मागावी, अशी आमची मागणी आहे. उद्धव ठाकरेंनी राहुल गांधींना माफी मागायला लावावी. तसेच, मविआच्या छत्रपती संभाजीनगरमधील वज्रमुठ सभेवरही आशिष शेलार यांनी टीका केली. वज्रमुठ ही एकीची असते. मात्र, 10 ते 15 जण जेव्हा हात हातात घेऊन चालतात तेव्हा त्याला चाचपडणे म्हणतात. दरम्यान, दादरमधील भाजप व शिवसेनेच्या या यात्रेत शेकडो नागरिक सहभागी झाले आहेत. विद्यार्थिनीही पारंपारिक वेशभूषेत या यात्रेत सहभागी झाले आहेत.
छत्रपती संभाजीनगरमध्ये आज पॉलिटिकल ड्रामा
छत्रपती संभाजीनगर शहरात महाविकास आघाडीची आज वज्रमुठ सभा होत आहे. दुसरीकडे भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेतर्फे शहरात सावरकर गौरव यात्रा काढण्यात येणार आहे. स्वातंत्रवीर सावरकर चौक समर्थनगर येथुन या यात्रेला सुरुवात होऊन, निराला बाजार मार्गे महात्मा फुले चौक, औरंगपुरा गुलमंडी मार्गे, उत्तम मिठाई भंडार भाटी बजार, पांदरीबा, अप्पाहलवाई मिठाई संस्थान गणपती मंदिर समारोप होईल. यावेळी दोन्ही पक्षातील कार्यकर्ते मोठ्याप्रमाणावर सहभागी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे छत्रपती संभाजीनगरमध्ये आज ग्रेट पॉलिटिकल ड्रामा रंगण्याची शक्यता आहे.
राज्यभरात 6 एप्रिलपर्यंत सावरकर गौरव यात्रा
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या स्वातंत्र्य लढ्यातील कामगिरीचे स्मरण करून देण्यासाठी राज्यभरात 30 मार्च पासून भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेतर्फे सावरकर गौरव यात्रा काढण्यात येत आहे. ही यात्रा 6 एप्रिलपर्यंत चालणार आहे. नव्या पिढीला स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कार्याची ओळख करून देण्यासाठी तसेच राहुल गांधींनी सावरकरांविरोधात केलेल्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी सावरकर गौरव यात्रा काढण्यात येत आहे.
संबंधित वृत्त
हिंदूत्वावरुन टीका:भाजप आणि शिंदे गट सावरकरवादी असूच शकत नाही, 'सावरकर गौरव यात्रा', हे केवळ ढोंग- संजय राऊत
भाजप आणि शिंदे गट सावरकरवादी असूच शकत नाही. त्यांनी काढलेली 'सावरकर गौरव यात्रा' केवळ ढोंग आहे, अशी टीका ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केली. आज पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणाले, सावरकरांनी या देशाला एक दिशा दिली आहे. वैज्ञानिक दृष्टीकोन दिला आहे. सावरकरांनी हिंदुत्वाचा विचार देताना पुरोगामी आणि विज्ञानवाद याचा महत्त्वाचा संदर्भ दिला. भाजप गायला गोमाता मानते. मात्र, सावरकरांना ते मान्य नव्हते. गाय उपयुक्त पशू आहे. जर गाय दूध देण्याची थांबली तर तिचे गोमांस खायला हरकत नाही हा सावरकरांचा विचार होता. हा भाजपाला मान्य आहे का?, असा प्रश्न संजय राऊतांनी केला आहे. वाचा सविस्तर
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.