आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुख्यमंत्री शिंदे यांचा उद्धव ठाकरेंना टोला:आम्ही गाजर हलवा तरी देतोय, त्यांनी काहीच दिले नाही; सगळे स्वत:च खाल्ले

मुंबई20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आम्ही गाजर हलवा तरी देतोय, त्यांनी काहीच दिले नाही; सगळे स्वत:च खाल्ले असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे.

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ​​​​​​आज सादर झालेल्या अर्थसंकल्पावर टीका करताना देवेंद्र फडणवीसांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पाचे दोन शब्दांत वर्णन करायचे त्याचे 'गाजर हलवा' अर्थसंकल्प, असे वर्णन करता येईल असे म्हटले होते. यावरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, आकडे फुगविण्यासाठी आम्ही बजेट मांडला नाही. आम्ही काही शिल्लक ठेवले नाही. बजेटचे आकडे पाहिल्यानंतर त्यांना (विरोधी पक्षांना) बोलायला काही नव्हते. त्यांच्याकडे उत्तर नाही. त्यांचा देवेंद्र फडणवीस यांनी करेक्ट कार्यक्रम केला आहे, असा टोला लगावला. तर राज्यातील जनतेसाठी आपण 700 नवीन आपला दवाखाना सुरू करतोय असे सांगतानाच आरोग्य व्यवस्था सक्षम करण्याचा राज्य सरकारचा बजेटमध्ये प्रयत्न असल्याचे म्हटले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, गेल्या 10 ते 15 वर्षांच्या इतिहासात सर्वात चांगले बजेट आहे. राज्याचा सर्वांगिण विकास करण्याच्या दृष्टीने हे बजेट मांडण्यात आले आहे. शेतकरी, विद्यार्थी कष्टकरी सगळ्यांचा विचार यामध्ये केला आहे. अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभ्यासपूर्ण बजेट सादर केले असून ज्येष्ठ आणि महिलांसाठी आम्ही विशेष सोय केली आहे. यात सर्व घटकांचा अभ्यास करुन बजेट सादर करण्यात आले असे मतही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी व्यक्त केले.

मुख्यमंत्री शिंदे बोलताना म्हणाले की, राज्य सरकार 6 हजार महिना शेतकऱ्यांना देणार आहे. आम्ही शेतकऱ्यांचे सरकार म्हणतो त्यासाठी आम्ही शेतकऱ्यांना 6000 रुपये सुरू केले तर केंद्र आणि राज्य सरकारच्या मदतीमुळे शेतकऱ्यांचा आत्महत्या थांबतील, असे मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले.

संबंधित वृत्त वाचा

अर्थसंकल्प म्हणजे गाजर हलवा!:उद्धव ठाकरेंची शेलकी टीका, म्हणाले- आमच्याच योजना नामांतर करुन नव्याने सादर केल्या

देवेंद्र फडणवीसांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पाचे दोन शब्दांत वर्णन करायचे त्याचे 'गाजर हलवा' अर्थसंकल्प, असे वर्णन करता येईल, अशी टीका माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली.

सरकारकडून अपेक्षा होती

विधिमंडळ परिसरात पत्रकारांशी संवाद साधताना उद्धव ठाकरे म्हणाले, मविआ काळात आम्ही दोन ते तीन वेळा अर्थसंकल्प मांडला. तेव्हा कोरोनाचे संकट होते. तसेच, केंद्र सरकारही आमच्या बाजूने नव्हते. त्यामुळे कधीही मागणी केली तरी आमची 25 हजार कोटींहून अधिक जीएसटी थकबाकी असायची. आता केंद्रातील महाशक्तीचा पाठिंबा असलेले सरकार राज्यात आहे. त्यामुळे सरकार चांगला अर्थसंकल्प मांडेल, चांगला कारभार करेल, अशी अपेक्षा होती. वाचा सविस्तर

बातम्या आणखी आहेत...