आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपला पाठिंबा देण्याचा अजून निर्णय नाही:बंडखोर एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया; मी काल, आज आणि उद्याही शिवसैनिकच

मुंबई/ गुवाहाटी4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अद्याप राज्यपालांना भेटण्याचा तसेच भाजपला पाठिंबा देण्याचा कुठलाही निर्णय झालेला नाही. आम्ही गुवाहाटीत 40 पेक्षा जास्त आमदार आहोत. आम्ही शिवसेना सोडण्याचा तसेच इतर कुठल्याही पक्षात जाण्याचा निर्णय घेतलेला नाही, फक्त आम्ही बाळासाहेबांचे हिंदुत्व, त्यांची भूमिका पुढे घेऊ जात आहे. सत्तेसाठी बाळासाहेबांच्या विचारांची तडजोड आम्ही करणार नाहीत, अशी प्रतिक्रिया मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. एकनाथ शिंदे यांच्यासह 40 आमदार सध्या भाजप शासित प्रदेश आसामच्या गुवाहाटीत आहेत.

पुढे ते म्हणाले की, आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत त्यामुळे त्यांच्या विचारांवर आम्ही काम करणार आहोत. म्हणून, बाळासाहेबांच्या विचाराचे सर्व आमदार एकत्र आले आहेत. सध्या आम्ही कोणावर टीका टिप्पणी केलेली नाही. त्यामुळे विकासाचे राजकारण आणि बाळासाहेबांचे विचार पुढे नेण्याचा आमचा प्रयत्न असणार आहेत.

काल, आज, उद्याही शिवसैनिक

पुढे एकनाथ शिंदे म्हणाले की, मी कालही कट्टर शिवसैनिक होतो आणि आजही आहे आणि उद्याही राहणार आहे. आमची भूमिका सुरुवातीपासून हिंदुत्वाची होती. त्यामुळे मी बाळासाहेबांचे विचार पुढे नेणार आहे. माझ्यासोबत कुठल्याही जोर-जबरदस्तीने आमदार आलेले नाहीत. स्वत:च्या मर्जीने ते माझ्यासोबत आले आहेत. 40 आमदार माझ्यासोबत आहेत.

बातम्या आणखी आहेत...