आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बंडखोरांच्या निलंबनासाठी मविआचे डावपेच:राष्ट्रवादी-शिवसेनेची 'मातोश्री'वर बैठक; बंडखोरांवर दबाव वाढवण्याची ठरली रणनीती

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीमुळे राज्यात निर्माण झालेल्या राजकीय पेचप्रसंगाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना नेत्यांची शुक्रवारी 'मातोश्री'वर एक महत्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीत सेनेतील बंडखोरी मोडून काढण्याची विस्तृत रणनिती ठरल्याचा दावा केला जात आहे. विशेषतः बैठकीला उपस्थित सर्वच नेत्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पाठिशी ठामपणे उभे राहण्याचा निर्धार व्यक्त केल्यामुळे राज्यातील राजकीय घडामोडी अधिकच वेगवान होण्याची शक्यता आहे.

या बैठकीला राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह अजित पवार, शिवसेना खासदार आमदार अनिल देसाई, विनायक राऊत आदी बडे नेते हजर होते. विधान भवनात बंडखोर आमदारांच्या निलंबनाची प्रक्रिया कशी पार पाडावी. तसेच सध्याचा राजकीय घटनाक्रम अधिकाधिक दिवस लांबवून शिंदे गटावर दबाव कसा वाढवावा या मुद्यांवर यावेळी सखोल सल्लामसलत करण्यात आली.

दोन ते तीन बंडखोर आमदारांना स्वगृही आणण्यात यश आल्यास शिंदे गटाला जबर धक्का बसून त्यांच्यावरील दबाव वाढेल असा विचारही या बैठकीत मांडण्यात आला.

बातम्या आणखी आहेत...