आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुख्यमंत्र्यांना धमकी:'मी एकनाथ शिंदे यांना उडवणार आहे', असा फोन करणाऱ्याला पुण्यातून अटक; दारूच्या नशेत केला होता फोन

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

'मी एकनाथ शिंदे यांना उडवणार आहे', असा धमकीचा फोन 112 या आपत्कालीन हेल्पलाईन क्रमांकावर आला होता. पोलिसांनी याची तातडीने दखल घेत फोन करणाऱ्याला अटक केली आहे.

एक वाक्य बोलून फोन कट

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 112 या आपत्कालीन हेल्पलाईन क्रमांकावर एका व्यक्तीने फोन करुन 'मी एकनाथ शिंदे यांना उडवणार आहे', अशी धमकी दिली. एवढे एकच वाक्य बोलून व्यक्तीने फोन कट केला. पोलिसांनी तातडीने याचा तपास केला असता पुण्यातील वारजे या भागातून हा फोन आल्याचे समजले आहे.

दारुच्या नशेत केला फोन

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना धमकीचा फोन आल्यानंतर पोलिस तत्काळ सक्रिय झाले आणि फोन करणाऱ्याचे लोकेशन ट्रेस केले. यानंतर पुणे पोलिसांनी फोन करणाऱ्याला अटक केली. फोन करणारा हा मुंबईतील धारावी भागातील रहिवासी आहे. त्याने दारूच्या नशेत फोन केल्याचे चौकशीत निष्पन्न झाले.

फोन करणाऱ्याला पुण्यातून अटक

राजेश आगवणे असे मुख्यमंत्र्यांना धमकी देणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. त्याला पुण्यातील वारजे परिसरातून ताब्यात घेण्यात आले. राजेशच्या फोननंतर महाराष्ट्र एटीएस आणि मुंबई क्राइम ब्रँचही त्याचा शोध घेत होते. मुंबई क्राइम ब्रँचचे एक पथक रात्री त्याच्या धारावी येथील घरीही गेले मात्र तेथे तो सापडला नाही. पोलिसांना त्याचे पुण्यातील लोकेशन सापडले, त्यानंतर पुणे पोलिस आणि नागपूर एटीएसच्या पथकाने त्याला ताब्यात घेऊन पुढील कारवाई सुरू केली.

धमक्यांचे सत्र थांबणार केव्हा

दरम्यान, महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून नेत्यांना सातत्याने जीवे मारण्याच्या धमक्या येत आहे. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच उडवण्याची धमकी देण्यात आली. त्यामुळे धमक्यांचे हे सत्र थांबताना दिसत नाही. महाराष्ट्रात रोज एकाला धमकी येत असल्यामुळे राज्यातले राजकारण ढवळून निघाले आहे. राज्याचे गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरासमोर बॉम्ब ठेवल्याची धमकी आली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना तीनदा धमक्या मिळाल्या. देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नींना सुद्धा धमकी आली. अशोक चव्हाण, जितेंद्र आव्हाड, संजय राऊत ते थेट सलमान खान. या साऱ्यांना धमक्या मिळाल्या. धमक्यांचे हे सत्र थांबणार केव्हा?, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

संजय राऊत यांनाही आली होती धमकी

ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनाही काही दिवसांपूर्वी जीवे मारण्याची धमकी आल्याने खळबळ उडाली होती. संजय राऊत यांच्या मोबाइलवर पाठवलेल्या मॅसेजमध्ये राऊतांची एके 47 ने हत्या करण्याची धमकी देण्यात आली आहे. धमकीच्या मॅसेजमध्ये संजय राऊत यांना हिंदूविरोधी म्हटले आहे. पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला याच्याप्रमाणेच दिल्लीत संजय राऊतांची हत्या करू. लॉरेन्सकडून हा संदेश पाठवण्यात आला आहे, असे धमकीत म्हटले आहे. या प्रकरणी लॉरेन्स बिश्नोईवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संबंधित वृत्त

गुंडाराज:महाराष्ट्रात धमक्यांचे सत्र; गृहमंत्री, मंत्री, फडणवीसांची पत्नी, नेते ते सलमान खान टार्गेटवर, मग सामान्यांचे हाल काय?

राज्याचे गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनासुद्धा जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. याशिवाय अशोक चव्हाण, जितेंद्र आव्हाड, संजय राऊत ते थेट सलमान खान या साऱ्यांना जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्या आहेत. त्यामुळे हा महाराष्ट्राची वाटचाल बिहारच्या दिशेने होत आहे का?, असा सवाल निर्माण होत आहे. वाचा सविस्तर