आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्य सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री असूनही राजकीय जाणकार त्यांना नेहमीच ‘सुपर सीएम’ म्हणतात. 2023-24 च्या अर्थसंकल्पात मुख्यमंत्र्यांच्या खात्यांपेक्षा अधिक अर्थसंकल्पीय तरतूद त्यांच्या अंतर्गत येणाऱ्या विभागांसाठी झाली आहे. त्यामुळे फडणवीस यांचे राज्य सरकारवरील वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. असे असतानाही मुख्यमंत्री शिंदे यांचा पक्ष (शिवसेना) आणि भाजप यांच्यातील संघर्ष मात्र चव्हाट्यावर आलेला नाही.
मुख्यमंत्र्यांच्या विभागांना सुमारे 83,568 कोटी
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सामान्य प्रशासन (3993.01 कोटी), नगरविकास (52449.74 कोटी), माहिती व तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक प्रकल्प), वाहतूक, पणन, सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य (21091.2२ कोटी), मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन, मृद व जलसंधारण (4709.07 कोटी), पर्यावरण आणि वातावरणीय बदल विभाग (447.26 कोटी), आणि अल्पसंख्याक आणि औकाफ (877.82 कोटी) सारखे महत्त्वाचे विभाग आहेत. अशा प्रकारे मुख्यमंत्र्यांच्या विभागांना सुमारे 83,568.12 कोटी रुपये मिळाले आहेत. सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक प्रकल्प), परिवहन, पणन, मदत आणि पुनर्वसन आणि आपत्ती व्यवस्थापन यांसारख्या विभागांना मिळणारे बजेट जोडल्यास त्यांच्या विभागांच्या अर्थसंकल्पीय तरतुदीत वाढ होईल. वर्ष 2023-24 च्या अर्थसंकल्पाचा आकार 6,02,008.28 कोटी रुपये आहे.
फडणवीसांच्या खात्यांना 2. 41 लाख कोटी
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह (35499.83 कोटी), वित्त (160352.5७ कोटी), नियोजन (28870.28 कोटी), विधी व न्याय (4167.80 कोटी), गृहनिर्माण (3004.३० कोटी), ऊर्जा (8575.57 कोटी), नवीन व नवीकरणीय ऊर्जा (707.17 कोटी),राजशिष्टाचार आणि जलसंपदा व लाभक्षेत्र विकास हे महत्त्वाचे विभाग आहेत. अशाप्रकारे त्यांच्या विभागांना बजेटमध्ये एकूण 2,41,177.52 कोटी रुपये मिळाले आहेत.
कोणत्या मंत्र्याच्या खात्याला बजेटमध्ये किती रक्कम मिळाली (अंदाजे) :-
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.