आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुख्यमंत्र्यांनी कुंडलीच काढली:'मविआ' काळात फडणवीस, शेलार, महाजन, राणेंना अडकवण्याचा प्रयत्न झाल्याचा विधानसभेत आरोप

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी विधानसभेत 'मविआ' सरकारची कुंडलीच काढली. रवी राणांच्या पत्नीला आत घातले. कंगना राणावतचे घर तोडले. गिरीश महाजन, नारायण राणे, देवेंद्र फडणवीसांच्या कुटुंबाची चौकशी लावली. आशिष शेलारांवर खोटे गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न झाला. आपण असे केले. काय? जयंतराव मला माहिती आहे. दादांनाही माहिती आहे. असे प्रकार केले. हे जास्त काळ चालत नसल्याचे सुनावले. (मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे संपूर्ण भाषण ऐकण्यासाठी येथे क्लिक करा)

एकनाथ शिंदे म्हणाले, तुम्ही गुन्हा न करता मॉलमध्ये जाऊन माणसांना माराल, असे कसे होईल. जितेंद्र आव्हाड आपले चांगले मित्र आहेत. मात्र, सुप्रीम कोर्टाने आपली दखल घेऊन तपास करण्याच्या पोलिसांना सूचना केल्यात. मोठ्याने बोलले म्हणून सत्य लपत नाही, असा टोला त्यांनी हाणला.

आता गुन्ह्यांची नोंद

महाविकास आघाडी सरकारच्या काळात साधू हत्याकांड, संभाजीनगर दुर्दैवी घटना, साकीनाका दुर्दैवी घटना, मनसुख हिरेन प्रकरण घडले. तुम्ही आता गुन्ह्याची आकडेवारी दाखवली. मात्र, आता गुन्ह्याची नोंद होत आहे. दखल घेतली जात आहे. गुन्हेगाराला आळा घालण्याचे काम सरकार करणार आहे, असा निर्धार शिंदे यांनी व्यक्त केला.

पोरांच्या खांद्यावर बंदूक

एकनाथ शिंदे म्हणाले, एमपीएससीच्या पोरांच्या खांद्यावर बंदूक ठेवून तुम्हाला चालवायची आहे. एमपीएससीचे सगळे प्रश्न सोडवणार. सगळी पदे भरली आहेत. सहा सदस्य झालेत. आता अ, ब गटाचे पद भरत आहेत. ज्या दिवशी मुलाखत, त्या दिवशी निकाल हाती पडले, असे आश्वासनही त्यांनी दिले.

निर्णयाला महत्त्व

निवडणूक आयोग की लोकसेवा आयोग ह महत्त्वाचे नाही. निर्णयाला महत्त्व आहे. मी श्रेय घ्यायला गेलो नाही. लोकांच्या भावनांशी खेळायचे नाही. मी खुल्ला बोललो. तुम्ही पन्नास केस करून ठेवलेत. मी बोललो, खुलासा दिला. मी असे बोललो का, की मला आत्मक्लेश करायला यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीकडे जावे लागेल. दादा रेफरन्स येतो ना. काळजी करू नका.

नोकर भरती प्रगतीपथावर

सरकारकडून ७५ हजार नोकऱ्या भरती भरण्याचे काम प्रगतीपथावर आहे. लगेच नियुक्त्या देत आहोत. पोलिस भरती प्रगतीपथावर आहे. कौशल्य विकास मेळावे जोरात सुरू आहेत, असा दावा त्यांनी केला. शिवाय कोकणातले पत्रकार यांच्या हत्येची घटना अतिशय वाईट आहे. याप्रकरणी एसआयटी तपास सुरू आहे. त्यांच्या २५ लाख रुपयांची मदत दिली आहे. सरकार त्या कुटुंबाच्या पाठिशी असल्याची ग्वाही त्यांनी दिली.

संबंधित वृत्त

तुम्ही घटनाबाह्य विरोधी पक्षनेते आहात का?:शिंदे यांचा पवारांना सवाल; म्हणाले - तुमच्या पोटदुखीवर आमच्याकडे जालीम औषध

पोटनिवडणुकीत हरतो अन् अख्खे राज्य जिंकतो:मुख्यमंत्र्यांची विधानसभेत तुफान फटकेबाजी; ठाकरेंना टोले, पवारांना चिमटे!

विधिमंडळ अधिवेशन:देवेंद्र फडणवीसांच्या पुढच्या सुरस कथेने शॉक बसेल; साखर झोपेतल्या शपथविधीवर CM शिंदेंची टोलेबाजी

बातम्या आणखी आहेत...