आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • Eknath Shinde's Expulsion From The Post Of Group Leader Shide Said We Are Balasaheb's Shiv Sainiks; He Has Not Cheated For Power, Nor Will He

शिवसेनेने परतीचे दोर कापले:एकनाथ शिंदेंची गटनेते पदावरून हकालपट्टी; शिंदे म्हणतात सत्तेसाठी प्रतारणा करणार नाही

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

एकनाथ शिंदे सुरतमध्ये गेल्यापासून राज्यातील राजकीय घटनांनी वेग घेतला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेनेच्या गटनेते पदावरून हकालपट्टी केली आहे. शिवसेनेकडून एकनाथ शिंदेंवर मोठी कारवाई करण्यात आली आहे. तर एकनाथ शिंदे यांनी ट्विट करत आम्ही बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक आहोत. बाळासाहेबांनी आम्हाला हिंदुत्वाची शिकवण दिली आहे. बाळासाहेबांचे विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण यांच्याबाबत आम्ही सत्तेसाठी कधीही प्रतारणा केली नाही आणि करणार नाही असे ट्विट एकनाथ शिंदे यांनी केले आहे.

अजय चौधरी शिवसेनेचे नवे गटनेते

शिवसेनेचे शिवडी विधानसभा मतदारसंघातील आमदार अजय चौधरी यांची शिवसेनेच्या गटनेतेपदावर वर्णी लागली आहे. शिवसेनेत एकनाथ शिंदे यांच्या समर्थकांची संख्या मोठी आहे. त्यामुळे त्यांनी जर पक्ष सोडला तर त्यांच्यासोबत अनेक आमदार आणि नेते पक्ष सोडू शकतात. असा दावा अनेक राजकीय अभ्यासक करत आहेत. त्यातच शिवसेनेच्या बैठकीला केवळ 18 आमदार उपस्थित असल्याने इतर आमदार काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

शिवसेनेचा नविन गटातील नेते, आमदार
शिवसेनेचा नविन गटातील नेते, आमदार

काय म्हणाले जयंत पाटील?

शिवसेनेचा अंतर्गत प्रश्न आहे, अजित पवार यांच्या कार्यालयात बैठक बोलावली होती पण ती दुसऱ्या कामासाठी झाली त्यात कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही. आमदारांची मते फुटली, काँग्रेसची काही मते कमी झाली, शिवसेनेची मते कमी झाली. हे गुप्त मतदान होते त्यामुळे मते फुटली तरीही हे दोन्ही पक्ष आपले आमदार एकसंघ ठेवतील असेही ते म्हणाले.

एकनाथ शिंदे सुरतला गेले परंतू शिवसैनिक शिवसेना पक्षप्रमुखांच्या विरोधात जातील. सर्व आमदार शिवसेनेकडेच राहतील यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यशस्वी होतील.