आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री पदाचे आश्वासन दिले त्यांना निवडणुकीत खर्च करायला लावाला पण उद्धव ठाकरेच स्वतः मुख्यमंत्री पदावर बसले. ही शिंदेंची साफ फसवणूक आहे; त्यांचा स्वाभीमान जागृत झाला त्यामुळेच त्यांनी बंडखोरीचे पाऊल उचलले, मुख्यमंत्र्यांनी आता राजीनामा द्यावा अशी मागणीही केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केली आहे.
काय म्हणाले नारायण राणे?
सर्वांचे लक्ष एकनाथ शिंदेंकडे आहे. वेगवेगळ्या प्रसंगी एकनाथ शिंदेंना आश्वासने दिली होती पण त्यांची फसवणूक झाली त्यातून एकनाथ शिंदेंचा स्वाभीमान जागृत झाला त्यातून त्यांचे बंड सुरु आहे असे राणे म्हणाले.
ठाकरेंना सत्ता सांभाळता आली नाही
राणे म्हणाले, बाळासाहेबांनी शिवसैनिकांना प्रेम आणि जीव लावला. पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना अडीच वर्षे सरकार नीट चालवता आले नाही. फक्त मातोश्रीवरच ते बसुन होते त्यांनी कधीही कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेतल्या नाहीत. त्यात ते सहकाऱ्यांवर प्रेम कुठे करणार असा सवालही राणेंनी केला.
शिंदेंची भूमिका योग्यच
राणे म्हणाले की, मी टीव्हीवरुन एकनाथ शिंदेंची भूमिका मी पाहिली. शिवसेनेचे प्रतिनिधी एकनाथ शिंदेंना भेटले. राष्ट्रवादी-काँग्रेसला सोडा आणि भाजपसोबत सत्ता स्थापन करा अशी त्यांची भूमिका आहे. ही भूमिका हिंदुत्ववादी आहे आणि ती योग्यच आहे.
उद्धव ठाकरेंनी राजीनामा द्यावा
राणे म्हणाले की, मुख्यमंत्री ठाकरे यांनी क्षणभरही पदावर राहता कामा नये; पण ती नैतिकता उद्धव ठाकरेंकडे नाही. उद्धव ठाकरेंनी राजीनामा त्वरीत द्यावा ते राजीनामा का देत नाहीत? ते वाट कशाची बघत आहेत? असा घणाघात करुन प्रश्नही त्यांनी उपस्थित केले. मी योग्यवेळी योग्य निर्णय घेतला. जे काही आनंद दिघेंबाबत झाले ते इतरांशी होऊ नये. हिंदुत्ववादी विचारात जडणघडण झाली तेच विचार आपण अंगीकारावे असेही ते म्हणाले.
जे होतेय ते चांगलेच
महाविकास आघाडी सरकार आता अस्तित्वात नाही ही चांगली गोेष्ट आहे. सुडाचे राजकारण महाविकास आघाडी सरकारमधील उद्धव ठाकरे करीत होते आता जे होत आहे ते चांगल्यासाठी होत आहे. यानंतर महाराष्ट्रात एका तासात काय घडते हे आता कळेलच असेही राणे म्हणाले.
शिंदेंना मुख्यमंत्री पदाचे फक्त आश्वासनच
एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री पदाचे आश्वासन द्यायचे त्यांना खर्च करायला लावायचा आणि उद्धव ठाकरेंनी स्वतः मुख्यमंत्री पदावर बसतात त्यामुळे शिंदेंचा स्वाभीमान जागृत झाला असेही राणे म्हणाले.
शिवसेनेकडे फक्त अकरा आमदार
मातोश्रीबाहेर कुणालाही अधिकार नाही. जे शिवसेनेच्या वाट्याचे सरकार फक्त मातोश्री आणि त्यांच्या नातेवाईकांच्या वाट्याचेच होते. महाराष्ट्राचे पोलिस जर उद्धव ठाकरेंकडे असतील तर आमच्याकडे दिल्लीचे पोलिस आहेत. संजय राऊत काहीही बरळत आहेत. आता ते गप्पच बसले असतील. शिवसेना भवनाकडे पन्नास माणसेही नाहीत वर्षावर फक्त अकरा आमदाराच आहेत असा टोलाही राणे यांनी लगावला.
35 जण असतांना हकालपट्टी करण्याचा प्रश्नच नाही, वर्षावर केवळ 11 आमदार आहेत, सगळे आमदार शिंदेंसोबत आहेत. आम्ही लाचार नाही, हे उद्धव ठाकरे सारख्या लाचार व्यक्तिला माहित नाही.
ठाकरे पाय छाटायचे काम करतात
कोणत्याही आमदारांना मारहाण झाली नाही, संजय राऊत खोटे बोलतात, शिवसेनेत प्रभावी झालेले उद्धव ठाकरेंना चालत नाही, म्हणून उद्धव ठाकरे पाय छाटायचे काम करतात, छगन भुजबळ, मी त्यामुळेच पक्षातून बाहेर पडलो असा गौप्यस्फोट नारायण राणे यांनी केला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.