आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विधान परिषद निवडणुकीची रंगत:​​​​​​​राष्ट्रवादीकडून एकनाथ खडसे आणि रामराजे निंबाळकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल

मुंबई23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राष्ट्रवादी काँग्रेसकडून एकनाथ खडसे आणि रामराजे निंबाळकर यांना विधान परिषदेची उमेदवारी देण्यात आली आहे. या दोघांनी आज आपला उमेदवारी अर्ज भरला आहे. काही दिवसांपूर्वीच भाजपला रामराम ठोकून एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. त्यानंतर राष्ट्रवादीकडून त्यांचे राजकीय पुनर्वसन करण्यात येत आहे. त्यामुळे विधान परिषदेची रंगत आणखीणच वाढणार आहे.

तर भाजपकडून विधान परिषदेसाठी प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, राम शिंदे, उमा खापरे आणि श्रीकांत भारतीय यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. तर शिवेसनेकडून सचिन आहिर आणि आमश्या पाडवी यांनी उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. काँग्रेसकडून मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप आणि चंद्रकांत हंडोरे यांना संधी देण्यात आली असून, त्यांनी देखील आपला उमेदवारी अर्ज भरला आहे.

बुधवारी रात्री उशिरा राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक पार पडला. त्या बैठकीत रामराजे निंबाळकर आणि एकनाथ खडसे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. या दोन्ही उमेदवारांना प्रदेश कार्यालयातून उमेदवारी मिळाल्याचे फोन देखील गेले असल्याची माहिती आहे. त्यानंतर खडसे आणि निंबाळर यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

बातम्या आणखी आहेत...