आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विधान परिषद निवडणूक होणार:सदाभाऊ खोत, राष्ट्रवादी काँग्रेसचे शिवाजीराव गर्जे यांचा उमेदवारी अर्ज मागे

मुंबई17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

विधान परिषदेची निवडणूक होणार हे आता निश्चित झाले आहे. भाजपने 5 जागा लढवण्याचा निर्धार केला आहे. तर शिवसेना, राष्ट्रवादी, आणि काँग्रेसचे प्रत्येकी 2 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असणार आहे. यामुळे विधान परिषदेच्या निवडणुकीत चुरस पाहायला मिळणार आहे. सदाभाऊ खोत यांनी उमेदवारी मागे घेतल्यानंतर आता 10 जागांसाठी 11 उमेदवार रिंगणात आहेत.

20 जून रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार असून यामध्ये चार प्रमुख पक्षांनी या उमेदवारांना संधी दिली आहे. आता महाविकास आघाडी विधान परिषद निवडणुकीत राज्यसभेची स्थिती ओढावून घेते की, भाजपच्या 5 व्या उमेदवारांचा पराभव होतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

भाजपचे कोणते उमेदवार

राम शिंदे
राम शिंदे
श्रीकांत भारतीय
श्रीकांत भारतीय
उमा खापरे
उमा खापरे
प्रसाद लाड
प्रसाद लाड

विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर असे भाजपचे एकूण पाच उमेदवार विधान परिषदेची निवडणूक लढवणार आहेत.

शिवसेनेकडून यांना संधी

  • सचिन अहिर सचिन अहिर
नंदुरबारचे शिवसेना प्रमुख आमशा पाडवी यांनाही शिवसेनेची उमेदवारी
नंदुरबारचे शिवसेना प्रमुख आमशा पाडवी यांनाही शिवसेनेची उमेदवारी

​​​​​​​राष्ट्रवादीकडून यांना उमेदवारी

  • एकनाथ खडसे
  • विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांना राष्ट्रवादीकडून पुन्हा संधी

​​​​​​​काँग्रेसकडून यांनी भरला अर्ज

  • आम्ही महाविकास आघाडी म्हणून 6 जागा लढवत आहोत, या सहा जागांवर आमचा विजय होणारच असा विश्वास काँग्रेस उमेदवार भाई जगताप यांनी व्यक्त केला आहे. तर अपक्ष आमदार मविआसोबतच राहणार आहेत, असेही त्यांनी म्हटले आहे.
माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे यांना काँग्रेसकडून विधान परिषदेसाठी संधी
माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे यांना काँग्रेसकडून विधान परिषदेसाठी संधी

विधान परिषद निवडणुकीतून सदाभाऊ खोत यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. आज सकाळपासून सदाभाऊ उमेदवारी अर्ज मागे घेणार अशी चर्चा होती. तर राष्ट्रवादीचे शिवाजीराव गर्जे यांनीही आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे.

सदाभाऊ खोत यांनी आज सकाळी राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. "भाजप विधान परिषदेची सहावी जागा लढवणार असून, देवेंद्र फडणवीस जे बोलतील ते आपण करू" असे सदाभाऊ खोत यांनी म्हटले होते. मात्र, सदाभाऊ खोत यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने भाजपकडून आता विधान परिषदेसाठी पाच उमेदवारच उभे राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

विधानसभा आखाडा : 285 आमदार

मतांचा कोटा : 27

शिवसेना 55 मते+ 2 उमेदवार = 1 मत अतिरिक्त

राष्ट्रवादी 51 मते+ 2 उमेदवार = 3 मतांची गरज

काँग्रेस 44 मते +2 उमेदवार = 10 मतांची गरज

भाजप 106 मते + 5 उमेदवार = 29 मतांची गरज

बातम्या आणखी आहेत...