आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विधान परिषद निवडणूक:आमदारांसाठी हॉटेलमध्ये पार्टी!, आज भाजप, आघाडीचे बैठकांचे सत्र

मुंबई12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोमवारी होणाऱ्या विधान परिषदेच्या १० जागांसाठी ११ उमेदवार रिंगणात आहेत. निवडणुकीत मोठ्या प्रमाणात घोडेबाजाराची शक्यता आहे. यामुळे शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी आणि काँग्रेस दगाफटका टाळण्यासाठी आपापल्या आमदारांना ३ दिवस पंचतारांकित हॉटेलात मुक्कामी ठेवणार आहेत. आमदार राहणार असलेल्या हॉटेलचे एका दिवसाचे भाडे साधारणत: १० ते १८ हजार रुपयांदरम्यान आहे. हॉटेलच्या वेबसाइटवरून काढलेल्या दरपत्रकानुसार आमदारांचा मुक्कामाचा खर्च कोट्यवधी रुपयांमध्ये जाणार आहे. यात जेवण आणि इतर खर्च लावण्यात आला नाही, हे विशेष...

राज्यसभा निवडणुकीनंतर ७ दिवसांतच आमदार पुन्हा हॉटेलात
हॉटेलच्या वेबसाइटवरील माहितीनुसार सर्वसामान्यांसाठी प्रतिदिन किमान भाडे खालीलप्रमाणे. शुक्रवारी रात्री आमदार मुक्कामाला जाऊ शकतात.

विधान परिषदेच्या निवडणुकीतही अपक्षांची भूमिका ठरणार "अर्थ’पूर्ण
राज्यसभेप्रमाणेच विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये अपक्षांची भूमिका महत्त्वपूर्ण असेल. छोटे पक्ष आणि अपक्ष मिळून २९ आमदार आहेत. त्यांची मते आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न प्रामुख्याने भाजप आणि काँग्रेस करणार आहेत.

लाड यांच्या मतांसाठी राष्ट्रवादीच्या आमदारांवर डोळा
देवेंद्र फडणवीस यांच्या घरी गुरुवारी रात्री बैठक पार पडली. भाजपचे ५ वे उमेदवार प्रसाद लाड यांना जिंकून आणण्यासाठी १२ मते कमी पडत आहेत. या मतांची बेगमी कशी करायची, यावर खल झाला. ही अधिकची १२ ते १५ मते राष्ट्रवादीतून मिळू शकतात का? कारण लाड हे पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादीचे नेते आहेत, यावर विचार करण्यात आला.

सेनेची ५०% मते भाजपला : राणा या निवडणुकीत शिवसेनेची ५० टक्के मते भाजपला मिळतील, असा दावा देवेंद्र फडणवीसांच्या भेटीनंतर राणा दांपत्याने केला.

देशमुख, मलिकांचा फैसला आज
तुरुंगात असलेले नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांच्या मतदानाबाबतच्या याचिकेवर शुक्रवारी सुनावणी होणार आहे.

खडसे टार्गेट नाहीत : एकनाथ खडसे आमचे टार्गेट नाही तर आघाडीला हरवणे हा आमचा उद्देश आहे, असे मंत्री रावसाहेब दानवेंनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...