आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आमदारकीचा पेच अखेर संपुष्टाता आला आहे. कारण विधान परिषद निवडणुकीला केंद्रीय निवडणूक आयोगाची परवानगी दिली आहे. 27 मे पूर्वी महाराष्ट्रातील विधानपरिषदेच्या रिक्त 9 जागांसाठी निवडणुका होणार आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगानेच याबाबतची माहिती दिली. केंद्रीय निवडणूक आयोगाने निवडणुकीची तारीखही जाहीर केली आहे. येत्या 21 मे रोजी मुंबईत ही निवडणूक होणार आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे राज्य विधिमंडळातील कोणत्याही सभासदाचे सदस्य नसल्यामुळे त्यांना 27 मे 2020 पूर्वी कोणत्याही एका सभागृहावर नियुक्त होणे आवश्यक आहे. त्यामुळे विधान परिषदेच्या 9 रिक्त जागांसाठी लवकरात लवकर निवडणूक घेण्याची सूचना निवडणूक आयोगाला करावी, असे पत्र गुरुवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना दिले. हे पत्र घेऊन गुरुवारी सायंकाळी सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे आणि ठाकरे यांचे निकटवर्तीय मिलिंद नार्वेकर राज्यपालांना भेटले. त्यापाठोपाठ राज्यपालांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहून विधान परिषद निवडणुकीची घोषणा लवकरात लवकर करावी, अशी सूचना केली आहे.
निवडणूक कशासाठी?
राज्यपाल सदस्याच्या कोट्यातून उद्धव ठाकरे यांची विधान परिषदेवर नियुक्ती झाली तरीही त्या आमदारकीची मुदत जूनच्या दुसऱ्या आठवड्यात संपणार आहे. त्यामुळे नव्याने नियुक्तीऐवजी रिक्त जागांसाठी निवडणूक घेऊनच मुख्यमंत्र्यांनी रीतसर विधिमंडळाचे सदस्य व्हावे, असा मतप्रवाह होता.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.