आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई:महापालिकेची निवडणूक घेण्याचा दृष्टीने तयारी करण्याचे निवडणूक आयोगाचे मुंबई मनपाला आदेश

मुंबई19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कोरोनाच्या परिस्थीतीप्रमाणे राज्य सरकार निवडणुकीबाबत निर्णय घेणार

मुंबई महापालिकेची फेब्रुवारी २०२२ मध्ये होणारी सार्वत्रिक निवडणूक करोनामुळे पुढे ढकलली जाण्याची चर्चा सुरू असताना ही निवडणूक घेण्याच्या दृष्टीने तयारीला लागण्याचे निर्देश राज्य निवडणूक आयोगाने मुंबई महानगरपालिकेने दिले असल्याची माहिती महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे..

सध्या राज्यात असलेली कोरोनाची परिस्थिती पाहता ही निवडणूक पुढे ढकलण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती मात्र करोनाची तिसरी लाट यादरम्यान आल्यास त्यावेळच्या परिस्थितीप्रमाणे राज्य सरकार निवडणुकीबाबत निर्णय घेईल, असे स्पष्ट करत आयोगाने सन २०११च्या जनगणनेनुसार वॉर्डांची पुनर्रचना करण्याचे निर्देश देखील दिल्याची माहित महापौरांनी दिली आहे.

मुंबई महानगरपालिकेला राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार काम सूरू राहील मात्र योग्य वेळी निर्णय घेतला जाईल यात प्रामुख्याने नागरिकांच्या आरोग्याशी तडजोड केली जाणार नाही अशी माहिती देखील महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे

सध्या राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांचे मिळून महाविकास आघाडीचे सरकार आहे, त्यामुळे येत्या महापालिका निवडणुकीच्या वेळीदेखील तिन्ही पक्षांमध्ये किमान-समान कार्यक्रम ठरण्याची शक्यता आहे. मात्र काँग्रेस आणि भाजपने स्वतंत्र लढण्याची भूमिका घेतल्याने राष्ट्रवादी आणि शिवसेना या निवडणुकीत एकत्र येण्याची शक्यता आहे.

बातम्या आणखी आहेत...