आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'धनुष्यबाण' कोणाचे?:निवडणूक आयोगापुढे सुनावणी घेण्यास ठाकरे गटाचा विरोध, शिंदे गटानेही कागदपत्रे सादर केली नाहीत

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

एकनाथ शिंदे गटाने शिवसेनेवर आणि शिवसेनेच्या चिन्हावर दावा केला असून निवडणूक आयोगाकडेही धाव घेतली आहे. निवडणूक आयोगाने दोन्ही गटाला आपली बाजू मांडण्यास सांगितले होते. याबाबत कागदपत्रे सादर करण्याची आज शेवटची तारीख होती. पण आज दोन्ही गटाकडून कोणतीच कागदपत्रे निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आली नाही. त्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. तसेच, यामुळे तुर्तास निवडणूक आयोगापुढे तरी शिवसेना चिन्ह कोणाचे, यावर फैसला होणार नाही, हे आता स्पष्ट झाले आहे.

सर्वोच्च न्यायालयाची सुनावणी होईपर्यंत पक्षचिन्ह आणि ईतर बाबतीतील केंद्रीय निवडणूक आयोगात सुनावणी केली जाऊ नये अशी मागणी ठाकरे गटाने केली आहे. अत्यावश्यक कागदपत्रे आयोगाला आम्ही सादर करणार आहोत असेही शिवसेना नेते अनिल देसाई यांनी स्पष्ट केले.

पुरावे गोळा करण्यासाठी वेळ हवा अशी मागणीही शिवसेनेने निवडणूक आयोगाकडे केली आहे, आता शिवसेनेच्या मागणीवर निवडणूक आयोग काय निर्णय देतो याकडे लक्ष लागले आहे. तर पत्रकार परिषदेत देसाई यांनी स्पष्ट केले की,निवडणूक आयोगाचे वकील दातार यांचे म्हणणे ऐकून सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की, प्रोसेडिंग करा पण ठोस निर्णय घेऊ नका असे सांगितले. निवडणूक आयोगाने निर्णयाप्रत येऊ नये असेही म्हटले आहे. सर्वोच्च न्यायालयाचे आदेश सूचना कशापद्धतीने घेतले जातील यावर निवडणूक आयोगातील गोष्टी ठरतील.

आमचा दावा मजबूत

अनिल देसाई म्हणाले, पिपल्स अ‌ॅक्टनूसार, शिवसेना ही अधिकृत पक्ष आहे. त्यानूसार आमच्याकडे सर्व दस्ताऐवज आहेत. ते निवडणूक आयोगाला सादर केले जातील. ते तेथेच मांडले जाणार असून त्यातील मुद्दे महत्वाचे आणि परिणामकारक आहेत. सुनावणीदरम्यान शिंदे गटातील वकीलांना सवाल केले आहेत यालाही आमच्या दृष्टीने महत्व आहे.

सोशल मीडियावर दोन्ही बाजू दिसल्या

देसाई म्हणाले, शिंदे गटाला त्यांच्या मनाप्रमाणे गोष्टी हव्या आहेत. सुप्रीम कोर्टाच्या लिस्टींगमुळे 12 ऑगस्टला सुनावणी गेली आहे. कायद्यानूसार निश्चितच आम्हाला न्याय मिळेल. मुख्यमंत्र्यांना दिल्लीतील निती आयोगाच्या बैठकीत जी वागणूक मिळाली त्यावर सोशल मीडियावर दोन्ही बाजू आल्या आहेत.

आम्ही आवाज उठवतोय

देसाई म्हणाले, विरोधी पक्षांनी ताकद दाखवायला हवी. सत्तेचा वापर सत्ताधारी कसा करतात यावर आवाज उठवायला हवा. मी असो प्रियंका चतूर्वेदी असो आम्ही आवाज उठवला आहे. केंद्रीय यंत्रणाचा गैरवापर आम्ही सातत्याने होत आहे त्यावरही आवाज उठवत आहोत. शिवसेनेने शब्द दिल्याप्रमाणे राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतीपदासाठी पाठिंबा देत मतदान केले. ज्या पाच लोकांनी मतदान केले नाही त्यावरही लक्ष दिले जाणार आहे.

बातम्या आणखी आहेत...