आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वाढीव वीज बिल प्रकरण:साहेबांच्या आदेशानंतर रस्त्यावर संघर्ष करावाच लागेल,  कारण "लाथो के भूत बातों से नही मानते"; मनसे नेत्याचा सरकारला इशारा

मुंबई16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कोरोना काळात अनेकांना वाढीव वीज बिलाचा सामना करावा लागला.

लॉकडाऊनच्या काळातील वाढीव वीज बिलाच्या मुद्द्यावरून आता महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक होताना दिसत आहे. कोरोना काळात अनेकांना वाढीव वीज बिलाचा सामना करावा लागला. या बिलांमधून ग्राहकांना दिलासा मिळणार नसल्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊतांनी म्हटले होते. यावरुन आता मनसे नेत्याने थेट सरकारला इशारा दिला आहे. साहेबांच्या आदेशानंतर रस्त्यावर संघर्ष करावाच लागेल, कारण "लाथो के भूत बातों से नही मानते" असे ट्विट संदीप देशपांडे यांनी केले आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून वाढीव वीज बिल कमी करण्याची मागणी केली जात होती. मात्र वीज बिल कमी होणार नसल्याचे नितीन राऊतांनी म्हटले. तसेच वीज कंपन्या चुकीचे बिल देणार आणि सरकार त्याचे पैसे भरणार, हे कसे चालेल, असा सवाल करत उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांच्या अखत्यारीतील अर्थ विभागाने राऊत यांची सवलतीची मागणी फेटाळून लावली होती. त्यामुळे वीज सवलत मिळण्याची शक्यता आता नाही. यामुळे ग्राहकांमध्ये संतापाची भावना आहे. दरम्यान, यानंतर मनसेने ऊर्जामंत्र्यांवर टीका केली होती. आता मात्र मनसेने रस्त्यावर उतरुन संघर्ष करावा लागेल असे म्हणत इशारा दिला आहे.

मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ट्विटमध्ये म्हटले की, “वीज बिला संदर्भात निवेदन, अर्ज, बैठका, विनवण्या सगळं झालं. पण सरकार ढिम्म आहे. जनतेला दिलासा देण्यासाठी साहेबांच्या आदेशानंतर रस्त्यावर संघर्ष करावाच लागेल. कारण लाथो के भूत बातों से नही मानते,” असे म्हणत त्यांनी सरकारला इशारा दिला आहे. यावरुन मनसे लवकरच वाढीव वीज बिलासंदर्भात आक्रमक पवित्रा घेणार हे स्पष्ट होत आहे.