आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापावसाळ्यातील जुलै-ऑगस्ट महिन्यात राज्याची वीज मागणी १७ हजार ५०० ते १८ हजार मेगावॅटपर्यंत घसरते. मात्र, यंदा जुलै महिन्यातही राज्याची मागणी १९ हजार ९२३ मेगावॅटपर्यंत आहे. म्हणजेच यंदाच्या पावसाळ्यात वीज मागणीत सरासरी २ हजार मेगावॅटची वाढ झाली आहे. गेल्या तीन ते चार दिवसांपासून राज्यात पाऊस नाही. यामुळे कृषी क्षेत्र आणि कोरोनानंतर राज्याचा औद्योगिक वापर वाढल्याने ही मागणी वाढली आहे.
सन २०२० मध्ये कोरोना लॉकडाऊन काळात राज्याची विजेची मागणी ८ हजार मेगावॅटपर्यंत घसरली होती. तर एप्रिल-मे २०२२ मध्ये ती उच्चांकी २७ हजार मेगावॅटपर्यंत गेली होती. दरम्यान, पावसाळ्यात राज्याची सरासरी वीज मागणी १७ हजार ५०० ते १८ हजार मेेेगावॅटपर्यंत राहते. यंदा समाधानकारक पाऊस होऊन विजेची मागणी घटलेली नाही. उलट ती जुलैच्या सरासरीच्या तुलनेत २ हजार मेगावॅटने जास्त आहे. ३० जुलै दुपारी राज्याची मागणी १९ हजार ९२३, तर महावितरणची मागणी १६ हजार ७७० मेगावॅटपर्यंत होती. दमदार पाऊस होऊन कृषी क्षेत्रातील वापर कमी होत नाही, तोपर्यंत ही मागणी अशीच कायम राहील, असा अंदाज आहे.
कोळशाची टंचाई कायम...
महानिर्मितीच्या औष्णिक वीजनिर्मिती केंद्रांकडे उन्हाळ्यात कोळशाची टंचाई निर्माण झाली होती. ती अद्यापही कायम आहे. भुसावळ औष्णिक केंद्राला तीन दिवस, तर इतर केंद्रांकडे ८ ते १० दिवस पुरेल यापेक्षा जास्त कोळशाचा साठा नाही. मात्र, दररोज रेल्वे रॅकद्वारे कोळसा उपलब्ध होत आहे.
ओव्हरऑइलिंगची कामे ठप्प...
पावसाळ्यात विजेची मागणी कमी होते. या काळात औष्णिक केंद्रातील वीजनिर्मिती संचांची वार्षिक देखभाल दुरुस्ती केली जाते. त्यानुसार महानिर्मितीने भुसावळसह काही संचांचे वार्षिक देखभाल दुरुस्तीचे नियोजन केले होते. मात्र, आता विजेची मागणी वाढल्याने हे संच कार्यरत ठेवावे लागत आहे. ऑगस्टमध्ये ही कामे होऊ शकतात.
सर्वच जिल्ह्यांत वाढला विजेचा वापर
नाशिक, जळगाव व नगर या जिल्ह्यांत यापूर्वी कृषी विजेचा वापर जास्त राहत होता. आता तो इतर सर्वच जिल्ह्यांत वाढला आहे.
भारतीय उद्योग पूर्ण क्षमतेने सुरू असल्याने वापर
चीनमधील काही भागांमध्ये लॉकडाऊन आहे. यामुळे भारतीय उद्योग पूर्ण क्षमतेने सुरू आहेत. यामुळे औद्योगिक वापर जास्त आहे.
पाऊस नसल्याने मुंबईत नेहमीच वीज वापर वाढतो
मुंबईत पाऊस नाही. यामुळे दिवसा एसीमुळे विजेचा वापर सरासरी तीन हजार मेगावॅटने वाढतो. पाऊस झाल्यानंतर तो कमी होतो.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.