आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • Elgar Against Governor State Government; On December 17, Aghadi's March In Mumbai Appeals To Those Who Don't Like The Government's Policy To Join

राज्यपाल-राज्य सरकारविरुद्ध एल्गार, 17 डिसेंबरला आघाडीचा मुंबईत मोर्चा:सरकारचे धोरण पसंत नाही त्यांनी सामील होण्याचे आघाडीचे आवाहन

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजप नेत्यांची छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्याविषयी सातत्याने होत असलेली बेताल वक्तव्ये, कर्नाटक सीमा प्रश्न आणि महाराष्ट्रातील उद्योगधंदे गुजरातला नेण्याचे कारस्थान आदी मुद्दे घेऊन विरोधी पक्षाच्या महाविकास आघाडी व मित्रपक्षांकडून १७ डिसेंबर रोजी मुंबईत मोर्चाचे आयोजन केल्याची माहिती शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिली. जिजामाता उद्यान (भायखळा) ते आझाद मैदान (सीएसटी) असा मोर्चा असेल. ज्यांना हे सर्व पसंत नाही त्यांच्यासह भाजपमधील शिवप्रेमी मंडळींनी यात सहभागी व्हावे, असे आवाहन ठाकरे यांनी केले. विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या ‘देवगिरी’ या शासकीय निवासस्थानी महाविकास आघाडी व मित्रपक्षांतील प्रमुख नेत्यांची बैठक सोमवारी सायंकाळी पार पडली.

सीमावाद जुना, आता महाराष्ट्र तोडण्याचा प्रयत्न : उद्धव ठाकरे हे सरकार आल्यापासून महाराष्ट्राची सातत्याने अवहेलना होत आहे. सोबतच महापुरुषांचा अवमान करण्याबरोबरच फुटीरतेची बीजे पेरली जात आहेत. कर्नाटक-महाराष्ट्र वाद जुना आहे, पण आता काही गावे तेलंगण, गुजरातमध्ये जायचे म्हणतात. छत्रपतींचा महाराष्ट्र तोडण्याचा प्रयत्न हेतुपुरस्सर होतो आहे, असा गंभीर आरोप उद्धव ठाकरे यांनी केला.

बातम्या आणखी आहेत...