आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुंबई:'केईएम’ रुग्णालयाच्या शवगृहामध्ये जागा मिळेना, विविध मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांचे आंदोलन

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • केईएमच्या शवगृहातील 7 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण

केईएम या मुंबईतील विख्यात अशा मोठ्या रुग्णालयात आरोग्य कर्मचाऱ्यांनी मंगळवारी सकाळी काम बंद आंदोलन केल्याची घटना घडली. त्यामुळे मुंबई महापालिकेचा गलथान कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.

सकाळी ११ वाजता आरोग्य कर्मचाऱ्यांनी रुग्णालयाचे अधिष्ठाता डाॅ. हेमंत देशमुख यांच्या कक्षाबाहेर घोषणाबाजी केली. तसेच पीपीई किट, सुट्ट्या आणि कोरोना उपचारासंदर्भात त्यांनी काही मागण्या केल्या. केईएममधील एका आरोग्य कर्मचाऱ्याचे सोमवारी कोरोना संसर्गाने निधन झाले. त्या पार्श्वभूमीवर हे आंदोलन झाले.

केईएमधील शवगृहात मृतदेह ठेवण्यास जागा नाही. त्यामुळे वाॅर्डात खुल्या पद्धतीने स्ट्रेचरवर मृतदेह ठेवल्याची घटना आज उघडकीस आली. केईएमच्या शवगृहात २४ मृतदेह ठेवण्याची क्षमता आहे. सध्या केईएमध्ये ३७ शव आहेत, त्यामुळे काही मृतदेह शवागृहाबाहेर ठेवल्याचे सांगण्यात आले. कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूची संख्या मुंबईत वाढल्याने अंत्यसंसकाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. कोरोना मृतदेहावर अंत्यसंस्कारास ५ ते १० तासांचा विलंब होत आहे, असा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यानी केला आहे. कोरोना मृत्यूंची संख्या मुंबईत हजाराहून अधिक झाली आहे. एका महिन्यानी ही स्थिती अजून गंभीर होईल, त्या वेळी महापालिका प्रशासन काय करणार, असा सवाल सोमय्या यांनी केला.

बेस्टच्या ११० कर्मचाऱ्यांना लागण

केईएमच्या शवगृहातील ७ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. मुंबई अग्निशमन दलातील २९ कर्मचारी कोरोना पाॅझिटिव्ह आढळले आहेत. पालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षातील ७ कर्मचाऱ्याना कोरोना संसर्ग झाला आहे. तर बेस्ट बसचे ११० कर्मचारी कोरोनाने बाधित झाले आहेत. या सर्व आस्थापना मुंबई महापालिकेच्या असून पालिकेत सध्या शिवसेनेची सत्ता आहे. त्यामुळे शिवसेना नेतृत्वाला मुंबईकर अनेक प्रश्न विचारत ओहत.

बातम्या आणखी आहेत...