आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराहणीमानाच्या वाढत्या खर्चामुळे, दिल्ली, मुंबई, बंगळुरू, चेन्नई या महानगरांमधील तंत्रज्ञान कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना आता जयपूर, इंदूर, कोची आणि सुरतसारख्या टियर-२ किंवा टियर-३ शहरांमध्ये स्थलांतरित व्हायचे आहे.
कोरोनाच्या काळात मोठ्या संख्येने कर्मचारी आपापल्या गावी गेले होते आणि तेथून अजूनही काम करत आहेत. त्यापैकी ५० टक्के कर्मचाऱ्यांची सध्या मूळ कार्यालयात परतण्याची इच्छा नाही. ५० टक्के कर्मचाऱ्यांना सप्टेंबरपर्यंत त्यांच्या मूळ कार्यालयात परतायचे आहे. नॅसकॉम आणि बाेस्टन कन्सल्टिंग ग्रूपच्या (बीसीजी)अलीकडच्या अहवालानुसार सुमारे ६५ टक्के तंत्रज्ञान कामगार वाढत्या राहणीमानाच्या खर्चामुळे चिंतेत आहेत आणि त्यांना टियर-२ किंवा टियर-३ शहरांमध्ये जाण्याची इच्छा आहे. शेपिंग द फ्यूचर आॅफ वर्क इन इंडियाज टेक इंडस्ट्री नावाच्या एका अहवालानुसार मुंबईच्या तुलनेत सुरतमध्ये राहण्याचा खर्च ५०% कमी आहे. त्याचप्रमाणे जयपूरमध्ये राहणे दिल्लीच्या तुलनेत ३५ टक्के स्वस्त आहे. अहवालानुसार, सर्वेक्षण केलेल्या ८० टक्के कर्मचाऱ्यांनी हायब्रिड वर्क मॉडेलला प्राधान्य दिले, ज्यामध्ये त्यांना रिमोट काम करण्याची सुविधा मिळते. ते म्हणतात की, अशा प्रकारे ते महागाईच्या वातावरणात काही पैसे वाचवू शकतात.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.