आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिला सक्षमीकरण:ग्रामीण महिलांच्या हाताला काम देऊन सक्षम करणार : मंत्री सत्तार

मुंबई15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महिला स्वयंपूर्ण झाल्या तर राज्याची जलदगतीने उन्नती होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील महिलांच्या हाताला काम देऊन त्यांचे सक्षमीकरण करण्यासाठी अधिकचे प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे महसूल व ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी सांगितले.

मंत्रालयातील दालनात महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अर्थात एमएसआरएलएमच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.
योजनांविषयी जागृती करा : एमएसआरएलएम अंतर्गत असणाऱ्या योजनांची माहिती ग्रामीण भागातील महिलांपर्यंत पोहोचवा. त्याविषयी महिलांना माहिती असणे गरजेचे आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील महिला बचत गटांचे जनजागृती कार्यक्रम घ्या. त्यासाठी प्रत्येक जिल्हा परिषद गटात कार्यक्रम घेण्याचे निर्देशही राज्यमंत्री सत्तार यांनी यावेळी दिले.

बातम्या आणखी आहेत...