आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहावितरणच्या सुरक्षा व अंमलबजावणी विभागाचे उपसंचालक आणि महावितरणचे मुख्य तपास अधिकारी सुमित कुमार यांच्यावर भ्रष्टाचार व नैतिक अधःपतनाच्या गंभीर आरोपांची दखल घेत त्यांना निलंबित करण्याचे आदेश ऊर्जामंत्री डॉ नितीन राऊत यांनी आज विधानसभेत दिले.
आज विधानसभेत या विषयावर उपस्थित लक्षवेधी सूचनेला उत्तर दिले. विधानसभेत आमदार ज्ञानराज चौगुले यांनी ही लक्षवेधी सादर केली होती. या सादर केलेल्या चर्चेत आमदार अमित झनक, बळवंत वानखेडे, प्रकाश सुर्वे, अशोक उईके यांनी भाग घेऊन सुमित कुमार यांच्याविरुद्ध भ्रष्टाचाराच्या, अधिकाऱ्यांना धमकावण्याच्या व नैतिक अधःपतनाच्या गंभीर तक्रारी ऊर्जामंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिल्या.
आपल्या पदाचा दुरुपयोग करत महावितरणमधील मीटर रिडींग एजन्सी तसेच अधिकाऱ्यांकडून बेकायदेशीर पैशाची मागणी केल्याची, विविध अधिकारी कर्मचारी यांना धमकावल्याची रेकॉर्डिंग क्लिप उपलब्ध असूनही तत्कालीन व्यवस्थापकीय संचालक यांनी शिक्षा म्हणून केवळ बदली करणे, महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी आर्थिक संगनमत करून मुख्य तपास अधिकारी हे पद बळकावणे तसेच त्यांच्या विरोधात कल्याण परिमंडळ अंतर्गत नैतिक अधःपतनाच्या तक्रारी होण्याच्या मुद्द्यांवर ही लक्षवेधी सूचना विधानसभेत मांडण्यात आली होती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.