आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • Energy Minister Nitin Raut Big Annousment In Vidhansabha For Farmers; Farmers Will Get Electricity Under CM Solar Krishi Vahini Yojana | Marathi News

शेतकऱ्यांना विजेची सुविधा:शेतकऱ्यांसाठी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांची आणखी एक मोठी घोषणा; शेतकऱ्यांना मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत वीज मिळणार

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यात कृषी वीजबिलावरुन राजकारण तापले असताना आता, ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी आणखी एक मोठी घोषणा केली आहे. शेतकऱ्यांना त्वरित दिलासा देण्यासाठी ऊर्जामंत्र्यांनी विधानसभेत आज सौर कृषी वाहिनी योजनेची घोषणा केली. काल ऊर्जामंत्री नितिन राऊत यांनी वीज पुरवठा खंडीत केलेल्या कृषी ग्राहकांची वीज जोडणी पुर्ववत करण्याचा निर्णय घेण्यात येत असल्याची घोषणा केली होती. त्यानंतर त्यांनी आज दुसरी मोठी घोषणा केली आहे.

काल विधीमंडळात बोलताना राऊत म्हणाले की, पुढील 3 महिने या शेतकऱ्यांचा वीज पुरवठा खंडित केला जाणार नाही. तसेच, थकबाकीपोटी कृषी ग्राहकांची वीज जोडणी खंडीत करण्याची कारवाई तात्पुरत्या स्वरूपात थांबविण्याचा निर्णय घेण्यात असल्याचेही त्यांनी सांगितले.

त्यांनतर आज पुन्हा ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी विधानसभेत निवेदनाद्वारे आणखी एक घोषणा केली आहे. शेतकऱ्यांना मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत वीज देण्यात येणार आहे. यामुळे जास्त भार असलेली विजेची मागणी कमी होईल. या योजनेनुसार शेतकऱ्यांना आपल्या पडीक जमिनीवर सौर ऊर्जा प्रकल्प टाकून विजेची संधी उपलब्ध होईल. असे भाष्य नितीन राऊत यांनी केले आहे.

पुढे ते म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवन प्रकाश योजनेमधून अनुसूचित जाती जमातीच्या लोकांना वीज जोडणी देण्यासाठीची योजना करण्यात आली आहे. फक्त 500 रुपये भरूनही ही वीज जोडणी देण्यात येणार आहे. हजारो लोकांनी या योजनेचा लाभ घेतला असून, या योजनेलाही यासाठीची मुदतवाढ देणार. अशी घोषणा ऊर्जामंत्र्यांनी केली आहे.

यासोबत उपसा जलसिंचन योजनेची थकीत कृषी बिल पंपाचे कनेक्शन 3 महिने कट केले जाणार नाहीत. तसेच, वीज पुरवठा दिवसा देण्यात यावा. अशी मागणी ऊर्जामंत्र्यांकडे करण्यात आली होती. त्याचा विचार करून वीज पुरवठा दिवसाही अखंडितपणे सुरु ठेवणार असल्याची घोषणाही ऊर्जामंत्र्यांनी केली आहे.

बातम्या आणखी आहेत...