आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

मंत्र्यांना कोरोना:ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांना कोरोनाची लागण, पत्नीही पॉझिटिव्ह; स्वतःला घरातच केले आयसोलेट

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • याआधी महाविकास आघाडीतील मंत्र्यांना कोरोनाची लागण झाली होती

राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. अनेक नेते आणि मंत्री कोरोनाच्या विळख्यात सापडत आहेत. अशात आता काँग्रेस नेते आणि ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांना कोरोनाची लागण झाली आहे. लक्षणे नसल्यामुळे ते तूर्तास घरी क्वारंटाइन झाले आहेत. राऊत यांनी ट्विटरवरून ही माहिती दिली. तसेच माझ्या संपर्कात आलेल्यांनी कोरोनाची चाचणी करून घ्यावी असे आवाहनही त्यांनी केले आहे. नितीन राऊत यांच्या पत्नीलाही कोरोनाची लागण झाली असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

याआधीही हाविकास आघाडीतील अशोक चव्हाण, धनंजय मुंडे, अब्दुल सत्तार, जितेंद्र आव्हाड या मंत्र्यांना कोरोनाची लागण झाली होती. या सर्वांनी कोरोनावर मात केली.