आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

वीजबिलाचा प्रश्न:वर्क फ्रॉम होममुळे वाढला विजेचा वापर, एकत्रित वीजबिल एकरकमी भरणाऱ्या ग्राहकांना दोन टक्के सवलत - ऊर्जामंत्री नितीन राऊत

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो
  • मागणी करणाऱ्या ग्राहकांना वीजबिलांच्या तीन सामान हप्त्यांची सुविधा: ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत

तीन महिन्याचे एकत्रित वीजबिल एकरकमी भरणाऱ्या वीज ग्राहकांना त्यांच्या वीजबिलात दोन टक्के सवलत देण्यात येणार आहे. तसेच मागणी करणाऱ्या ग्राहकांना वीजबिलाचे तीन सामान हप्ते करून देण्यात येणार असल्याचे ऊर्जामंत्री ना. डॉ. नितीन राऊत यांनी मंगळवारी घोषित केले. वाढीव वीजबिलाच्या तक्रारींच्या अनुषंगाने आयोजित पत्रकार परिषदेत ऊर्जामंत्री ना. डॉ. राऊत यांनी वीजबिल अधिक येण्यामागची कारणे व ग्राहकांना दिलासा देण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती सविस्तरपणे दिली. 

माननीय वीज नियामक आयोगाने कोरोना महामारीच्या अनुषंगाने शासनातर्फे जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांची प्रत्यक्ष जागेवर जावून मीटरवाचन व वीजबिल वितरण न करण्यास महावितरणला आदेश दिले होते.

लॉकडाऊनच्या काळात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महावितरणने मिटर रीडींग व देयक वाटपाचे काम बंद ठेवल्याने एप्रिल व मे महिन्यात सरासरी वीजवापराची देयके आकारण्यात आलेली आहेत.

1 जून 2020 पासून शासनातर्फे प्रतिबंधित क्षेत्र वगळून इतर भागात लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्यात आलेली आहे. त्यानुषंगाने महावितरणने ग्राहकांना मिटर रीडींगनुसार वीजदेयक देण्यासाठी 1 जून 2020 पासून प्रतिबंधित क्षेत्र वगळून इतर ठिकाणी स्थानिक प्रशासनाच्या पूर्वपरवानगीने व शासनाने कोविड 19 संदर्भात वेळोवळी निर्गमित केलेल्या सूचनांचे पालन करुन मिटर रीडींग, वीजदेयके वाटप तसेच वीजदेयक संकलन केंद्रे पुन्हा सुरु केलेली आहेत.

जून-2020 मध्ये देयकाची रक्कम जास्त दिसण्याचे कारण म्हणजे लॉकडाऊन काळात (एप्रिल व मे महिना) आलेली सरासरी देयके ही कमी सरासरी युनिटने (डिसेंबर, जानेवारी व फेब्रुवारी) हिवाळयातील वीज वापरावर दिलेली आहेत आणि दुसऱ्या बाजूला घरगुती ग्राहकांच्या विजेच्या वापरात वर्क फ्रॉम होम व उन्हाळयामुळे मागच्या वर्षीपेक्षा वाढ झालेली आहे, जी जून-2020 च्या बिलात दिसून येते आहे.

जून-2020 चे बिल कसे योग्य आहे हे ग्राहकांना समजावून सांगण्यासाठी तसेच ग्राहकांच्या बिलांचे तक्रारीचे निराकरण करण्यासाठी सर्व क्षेत्रीय कार्यालयातील मुख्यअभियंता, अधिक्षक अभियंता यांना खालीलप्रमाणे सूचना देण्यात आलेल्या आहेत.

1) सर्व क्षेत्रीय कार्यालयात ग्राहक मदत कक्ष स्थापन करणे.

2) ग्राहकांशी वेबिनारआणि फेसबुक लाइव संवाद साधणे.

3) स्थानिक वृत्तवाहिनी व FM रेडीओ चॅनलद्वारे माहिती देणे.

4) स्थानिक वृत्तवाहिनीवरून माहिती देणे. 

5) आठवडा बाजार व रहिवाशी सोसायटीमध्ये मेळावे घेणे.

6) मीटर रीडर व बिल वाटप करणारे कर्मचारी यांना प्रशिक्षण देऊन ग्राहकांसोबत संवाद साधणे.

7) एसएमएस पोस्टर्सद्वारे वीज आकारणीबद्दल सुलभ माहिती देणे.

वरील सर्व उपाय योजनांचा वापर करून देखील ग्राहकांचे समाधान न झाल्यास ईमेल आयडी energyminister@mahadiscom.in व मोबईल क्र. 9833567777 व 9833717777 यावरून ग्राहकांच्या तक्रारींचे  निरसन त्वरित करण्यात येईल.

जून 2020 घरगुती ग्राहकांसाठी वीजबिल भरण्याची पद्धत 

घरगुती ग्राहकांसाठी 3 आठवड्यांत वीजबिल भरण्याची सवलत.

महावितरणच्या कार्यालयात जाण्याची ग्राहकांना कोणतीही गरज नाही.

कुठल्याही वीजबिल भरणा केंद्रावर जाऊन कमितकमी वीजबिलाच्या १/३ रक्कम भरता येईल.

संपूर्ण वीजबिल एकाचवेळी भरल्यास २ टक्क्यांची वीजबिलामध्येसूट देण्यात येईल.

ज्या ग्राहकांनी या अगोदर संपूर्ण रक्कमेच्या वीजबिल भरले असल्यास, त्यांना देखील ती सूट त्यांच्रूा वीजबिलामध्ये देण्यात येईल.

जे घरगुती ग्राहक लॉकडाऊनमुळे आपल्या मूळगावी गेल्यामुळे त्यांचा वीजवापर हा अगदी कमी झाला आहे. तरी त्यांना मीटर रीडिंग न घेतल्यामुळे मागील वीजवापरानुसार सरासरी वीजबिल देण्यात आले आहे. अशा ग्राहकांच्या वीजमीटरचे प्रत्यक्ष मीटर रीडिंग घेऊन, त्यांचे वीजबिल दुरूस्त करण्यात येतील.

0