आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वाढीव वीजबिल मुद्दा:आधीच तुम्ही थकबाकीचा डोंगर करून ठेवलाय तो थोडा हलका होऊ द्या; नितीन राऊतांचा भाजपला टोला

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • स्वतःची वीजबिले भरणाऱ्या भाजप आमदारांचे आभार मानत ऊर्जामंत्र्यांचा भाजपवर निशाणा

लॉकडाउनमध्ये आलेल्या वाढीव वीजबिलामुळे राज्यात राजकारण तापले आहे. भाजपकडून ऊर्जामंत्री आणि सरकारवर टीका केली जात आहे. यातच आता स्वतःची वीजबिले भरणाऱ्या भाजप आमदारांचे आभार असे म्हणत ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी भाजपला टोला लगावला. ट्विट करत नितीन राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.

नितीन राऊत यांनी ट्विट केले की, 'वीजबिले योग्य आहेत म्हणून स्वतःची वीज बिले भरणाऱ्या भाजप आमदारांचे आभार! आपल्याप्रमाणे जनतेला ज्यांना वीज बिल भरायची आहेत, त्यांना ती भरू द्या! आधीच तुम्ही थकबाकीचा डोंगर करून ठेवलाय तो थोडा हलका होऊ द्या.''

हे चौकीदार नाहीत तर जीएसटीचे थकबाकीदार

वाढीव वीजबिल माफ करावे यासाठी भाजपकडून राज्यात वीजबिलांची होळी करण्यात आली होती. तसेच जोपर्यंत वीजबिल माफी होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू राहणार असा इशाराही दिला होती. दरम्यान भाजपने जीएसटी थकबाकीच्या वसुलीसाठी आंदोलन करावे. केंद्र सरकारकडून जीएसटीचे पैसे येणे बाकी आहे. केंद्राने ते पैसे दिल्यास आम्ही कधीही वीजबिल माफ करायला तयार आहोत. ते म्हणतात आम्ही चौकीदार आहोत. पण हे चौकीदार नाही तर जीएसटीचे थकबाकीदार आहेत. असे म्हणत नितीन राऊत यांनी भाजपवर टीकास्त्र सोडले होते.

...त्यामुळे आजची परिस्थिती वीजबिल माफ करण्यासारखी नाही

मीटर रीडिंगप्रमाणे आलेली वीजबिले लोकांनी भरली पाहिजेत. महाविकास आघाडीचे सरकार गरिबांचे, शेतकऱ्यांचे आणि जनतेने निवडून दिलेले सरकार आहे. मागच्या सरकारने कर्जाचा बोजा वाढवून ठेवल्यामुळे आजची परिस्थिती वीजबिल माफ करण्यासारखी नाहीत. हे भाजपचे पाप आहे. असा हल्लाबोलही त्यांनी केला होता.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser