आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

मुंबई विमानतळ घोटाळा:जीव्हीके समूहाच्या कंपन्यांच्या प्रमोटर्सच्या मुंबई आणि हैदराबाद येथील ठिकाणांवर ईडीची छापेमारी, 705 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • यापूर्वी सीबीआयने मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि जीव्हीके रेड्डी यांच्या मुंबई व हैदराबादमधील ठिकाणांसह 6 ठिकाणी तपासणी केली होती
  • सीबीआयच्या एफआयआरनुसार आरोपींनी मुंबई विमानतळ विकासाच्या नावाखाली 2012 ते 2018 दरम्यान घोटाळा केला होता

जीव्हीके ग्रुप ऑफ कंपनीचे चेअरमन जी वेंकट कृष्णा (जीव्हीके) रेड्डी आणि त्याचा मुलगा जीव्ही संजय रेड्डी आणि कंपनीच्या प्रमोटरच्या अनेक ठिकाणांवर (9-12) अंमलबजावणी संचालनालय टीमने छापेमारी केली आहे. कृष्णा रेड्डी, त्याचा मुलगा आणि मुंबई आणि हैदराबादमधील त्यांचे नातेवाईक यांची घरे आणि कार्यालयात ही कारवाई करण्यात आली. सीबीआयनेही या दोघांविरूद्ध जूनमध्ये एफआयआर नोंदवला होता. कंपनीने मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या विकासात 705 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप आहे.

एफआयआरमध्ये 9 कंपन्यांची नाव
सीबीआयच्या एफआयआरमध्ये एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाचे काही अधिकारी, मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिडेट, जीव्हीके एअरपोर्ट होल्डिंग्स लिमिटेडसह 9 प्रायव्हेट कंपन्यांचे नावही होते. यापूर्वी सीबीआयने मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि जीव्ही के रेड्डीच्या मुंबई आणि हैदराबाद येथील ठिकाणांसह 6 ठिकाणांची तपासणी केली होती.

जीव्हीके एअरपोर्ट होल्डिंग्स लिमिटेड, एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया (एएआय) आणि काही विदेशी कंपन्यांनी जॉइंट वेंचरमध्ये मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड (एमआयएएल) नावाने कंपनी बनवली होती. याच्या 50.5% शेअर जीव्हीकेच्या जवळ आणि 26 % एएआय जवळ आहे.

जीव्हीके ग्रपवर आरोप - खोटे काँन्ट्रॅक दाखवून घोटाळा केला
एफआयआरनुसार आरोपींनी 2012 ते 2018 च्या काळात मुंबई एअरपोर्टच्या डेव्हलपमेंटच्या नावावर घोटाळा केला. जीव्हीके ग्रपने एमआयएएलच्या सरप्लस फंडमधून 395 कोटी रुपये आपल्या दुसऱ्या कंपन्यांमध्ये लावले. एमआयएएल मुंबई येथील असूनही सरप्लस फंडला हैदराबास बँकांमध्ये ठेवण्यात आले. या हेराफेरीसाठी बोर्डाच्या मीटिंगचा बनावट प्रस्ताव तयार करण्यात आला. दूसरीकडे बनवाट काँन्ट्रॅक्ट दाखवून 310 कोटींचा घोटाळा करण्यात आला.

एमआयएएल वार्षिक उत्पन्नाच्या 38.7% एएआयला देते
2006 मध्ये एआयए आणि एमआयएएल यांच्यात करार झाला की एमआयएएल मुंबई विमानतळ चालवेल आणि एआयएला वार्षिक महसुलाच्या 38.7% फी म्हणून देईल. उर्वरित रक्कम विमानतळाच्या आधुनिकीकरण, ऑपरेशन आणि देखभाल खर्चात खर्च केली जाईल.