आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुंबई:अभियांत्रिकी, चिकित्साशास्त्र, व्यवस्थापनशास्त्र इ. विविध तंत्र विषयांचे शिक्षण संस्कृतमधून द्यावे : बाबा रामदेव

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • संस्कृत केवळ भाषा नसून ती एक संस्कृती आहे - रामदेव बाबा

संस्कृत केवळ भाषा नसून ती एक संस्कृती आहे. भाषा, साहित्य, वेदविद्या, दर्शनादी विविध शास्त्रे संस्कृतमधून आहेत. परा-अपरा विद्या, प्रवृत्ती–निवृत्ती, प्रेयस-श्रेयस या सर्वांचे सार संस्कृत भाषा आहे. अभियांत्रिकी, चिकित्साशास्त्र, व्यवस्थापनशास्त्र इ. विविध तंत्र विषयांचे शिक्षण संस्कृतमधून झाले पाहिजे, असे बाबा रामदेव यांनी सांगितले.

रामटेक येथील कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाचा ९ वा पदवी प्रदान समारंभ राज्यपाल भगतसिंह कोश्यारी तसेच पतंजली योगपीठाचे प्रमुख बाबा रामदेव यांच्या आभासी उपस्थितीत झाला त्या वेळी ते बोलत होते. नवीन शैक्षणिक धोरणात पहिली ते बारावी संस्कृत शिक्षण अनिवार्य करण्यात येणार आहे. त्यासाठी आवश्यक संस्कृत शिक्षकांची गरज संस्कृत विद्यापीठाने पूर्ण करावी, अशीही अपेक्षा बाबा रामदेव यांनी व्यक्त केली. या वेळी संस्कृत विद्यापीठाचे संस्थापक कुलगुरू डॉ. पंकज चांदे, कैवल्यधाम योग संस्थेचे सचिव ओमप्रकाश तिवारी यांना मानद विद्या वाचस्पती ही पदवी प्रदान करण्यात आली. निवडक स्नातकांना पीएचडी व सुवर्णपदके प्रदान करण्यात आली. संस्कृत विद्यापीठाने महाकवी कालिदास यांचे समग्र साहित्य मराठीत भाषांतरित केल्याचे सांगून विद्यापीठ सर्व बाबतीत स्वयंपूर्ण होत असल्याचे कुलगुरू डॉ. श्रीनिवास वरखेडी यांनी या वेळी सांगितले.