आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोना विषाणू:इंग्लंड रिटर्न 1122 प्रवाशांपैकी 16 जणांना कोरोनाचा संसर्ग

मुंबई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंग्लंडमध्ये जनुकीय बदल झालेला कोरोना विषाणू आढळल्याच्या पार्श्वभूमीवर २५ नोव्हेंबर २०२० नंतर राज्यात इंग्लंडहून आलेल्या प्रवाशांचे सर्वेक्षण करण्यात येत आहे. आजपर्यंत ११२२ प्रवाशांची आरटी-पीसीआर चाचणी करण्यात आली आहे. यापैकी १६ प्रवासी कोरोनाबाधित आढळून आले आहेत.

त्यात नागपूर ४, मुंबई आणि ठाणे प्रत्येकी ३, पुणे २ आणि नांदेड, अहमदनगर, औरंगाबाद व रायगड येथील प्रत्येकी एकाला कोरोनाचा संसर्ग झाला आहे. पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांचे नमुने जनुकीय रचना शोधण्यासाठी एनआयव्ही पुणे येथे पाठवण्यात येत आहेत.

बाधित रुग्णांच्या निकट सहवासितांचा शोध घेण्यात येत आहे. आजवर शोधण्यात आलेल्या ७२ निकट सहवासितांपैकी २ जण कोरोनाबाधित आढळले आहेत.

बातम्या आणखी आहेत...