आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्यात राजकीय भूकंप आले असून, सत्ताधारी महाविकास आघाडी आता संकटात सापडली आहे. शिवसेनेचे नेते तसेच राज्याचे नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या अनेक आमदारांनी बंडखोरी केल्याने शिवसेना पक्ष अडचणीत आला आहे. तर दुसरीकडे राज्यात ईडीचे सत्र देखील सुरूच आहे. शिवसेनेचे नेते तसेच राज्यातील परिवहन मंत्री अनिल परब यांची गेल्या तीन दिवसांपासून ईडी चौकशी करत आहे. काल ईडीने परबांची सहा तास चौकशी केली. त्यानंतर आज त्यांना पुन्हा चौकशीसाठी बोलवण्यात आले आहे.
आज सलग चौथ्या दिवशी दापोली रिसॉर्ट प्रकरणी अनिल परबांची ईडी चौकशी होणार आहे. त्यांना ईडीने सकाळी अकरा वाजता चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे शिवसेनेसमोर आता दुहेरी संकट निर्माण झाल्याचे चित्र आहे. एकनाथ शिंदे यांच्यासह सेनेच्या 35 आमदारांनी बंडखोरी केली आहे. त्यातच आता परबांवर देखील ईडीकडून अटकेची टांगती तलवार आहे.
आज चौकशीसाठी बोलावले
अनिल परब यांना ईडीने आज पुन्हा चौकशीसाठी बोलावले आहे. गेल्या तीन दिवासांपासून त्यांची ईडीकडून चौकशी सुरू आहे. मंगळवारी त्यांची 11 तास चौकशी करण्यात आली होती. तर बुधवारी आठ आणि गुरुवारी सहा तास चौकशी करण्यात आली आहे. त्यानंतर आज परबांना ईडीने पुन्हा चौकशासाठी बोलावले आहे.
प्रकरण आहे काय?
पर्यावरण मंत्रालय भारत सरकार यांनी 31 जानेवारी 2022 रोजी दापोली रत्नागिरी येथील साई रिसॉर्ट हे अनधिकृत असून तोडण्याचे आदेश दिले होते. 90 दिवसांमध्ये रिसॉर्ट मालक किंवा प्रशासनाने हे दोन्ही रिसॉर्ट तोडायचे होते. मात्र, 90 दिवस पूर्ण झाले असून अजूनही रिसॉर्ट पाडण्यात आले नाही. या रिसॉर्टच्या व्यवहार प्रकरणात मनी लाँड्रिंगचा आरोप करण्यात येत आहे
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.