आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • Enthusiasm Among Citizens Due To Lifting Of Corona Ban After Two Years, Also Preparation For Mumbai Municipal Corporation Elections | Marathi News

मुंबईत शिवसेनेचा गुढीपाडवा:दोन वर्षानंतर कोरोना निर्बंध उठल्याने नागरिकांत उत्साह, मुंबई महानगर पालिका निवडणुकीचीही तयारी

मुंबई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सण आणि उत्सव म्हटले की मुंबईची तयारी वेगळीच असते. मात्र गेल्या दोन वर्षापासून कोरोना निर्बंधामुळे मुंबईकरांना या उत्साहाला आवर घालावा लागला होता. राज्य सरकारने गुढीपाडव्यापासून हे निर्बंध शिथिल करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे दोन वर्षानंतर गुढीपाडव्याचा सण मुंबईत उत्साहात साजरा करण्यात आला. मुंबईतील गिरगाव मध्ये निघणारी मिरवणुक प्रसिद्ध आहे. यंदा मात्र शिवसेनेच्यावतीने मिरवणूक काढण्यात आली. आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका पाहता या मिरवणुकीत देखील ही निवडणुकीची तयारी असल्याचे दिसून आले. या मिरवणुकीचे लक्षवेधी क्षण....

मिरवणुकीत सहभागी होऊन ढोल वादनाचा आनंद घेणारी रणरागिणी.

गिरगावमधील ढोल पथक म्हणजे आनंदाची पर्वणी असते.

हातात तलवार घेत या रणरागिणीने घोड्यावर बसून सर्वांचे लक्ष वेधले होते.

खंडेरायाची बानुबया... चिमुकल्या मुलीने घेतलेला हा अवतार सर्वांच्या नजरा खेळवून ठेवत होता.

हिंदवी स्वराज्याची स्थापना करणाऱ्या छत्रपती शिवरायांच्या प्रत्येक मावळ्यामध्ये भारतीय संस्कृतीवरील प्रेम आजही जसेच्या तसे दिसते.

है तैयार हम... असे म्हणत मराठी मातीत जन्मलेल्या या रणरागिणीने चिमुकल्या बाळकृष्णाला असे उचलून घेतले होते.

भारतीय शौर्याला जगाने प्रणाम करावा, असा पराक्रम गाजवणाऱ्या पेशवाईचा पोषाख परिधान केलेले हे चिमुकले सर्वांचेच लक्ष वेधून घेत होते.

विठू माझा... भोळा.... पंढरपूरच्या पांडुरंगाचे दर्शन घडवणाऱ्या या देखाव्याकडे पाहताच उपस्थितांना प्रभू भेटीची ओढ लागत होती. अत्यंत विलोभणीय रुप या माध्यमातून साकारण्यात आले होते.

भारतीय खेळाची ओळख सांगणाऱ्या मल्ल खांबची प्रात्याक्षिके सादर करण्यात आली.

या प्रात्याक्षिकांमध्ये मुलांबरोबरच मुलींनीही कर्तब दाखवले.

शिवसेनेच्या वतीने काढण्यात आलेली भव्य आणि तेवढीच सुबक रांगोळी प्रत्येकाचे लक्ष वेधत होती.

लाख मेले तरी चालेल... पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे... असे म्हणत पावनखिंड लढवणाऱ्या विरसुपुत्रांना या निमित्त नमन करण्यात आले.

मुंबईचे डब्बेवाले ही मुंबईची ओळख आहे. या निमित्त त्यांच्या कार्याचा गौरव देखील करण्यात आला.

मुंबईतील हुतात्मा स्मारकाची प्रतिकृती या मिरवणुकीत लक्ष वेधत होती. प्रविण काटवी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ हा देखावा तयार करण्यात आला होता.

पारंपारिक वेशभुषेत अवतरलेला वासूदेव सर्वांना हरिणामाचे धडे देत होता.

आई भवानी तुझ्या कृपेने तारसी भक्ताला... आईचा उदो..उदो...

मुंबईला ठाकरे सरकारने दिलेल्या 'ग्रिन एनर्जी' उपक्रमाची माहिती देणारा देखावा आगामी मुंबई महानगर पालिका निवडणुकीची आठवण करुन देत होता.

बातम्या आणखी आहेत...