आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माय एफएमकडून नाशिकच्या उद्योजकांचा सिंगापुरात सन्मान:अभिनेत्री सई ताम्हणकरच्या हस्ते पुरस्कार वितरण

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

माय एफएम नेहमीच आपल्या कार्यात विविधतेचे प्रदर्शन घडवत आले आहे. माय एफएम अनेकदा समाजातील विविध घटकांसाठी वेगवेगळे उपक्रम राबवत असतो. व्यावसायिक, डॉक्टर तसेच महिलांसाठीही अनेक उपक्रम माय एफएमतर्फे राबवण्यात आले आहेत. आता असेच उपक्रम सातासमुद्रापार नेण्यात माय एफ एम पहिले रेडिओ स्टेशन ठरले आहे. नाशिकमधील ३५ व्यावसायिकांचा मराठी अभिनेत्री सई ताम्हणकर यांच्या हस्ते सिंगापूर येथील हॉटेल ग्रँड कॉप्थॉर्न वॉटरफ्रंट येथे भव्य व नेत्रदीपक सोहळ्यात सन्मान करण्यात आला. यात नाशिक येथील पराग शहा आणि हीना शहा, डॉ. हनुमंत बांगर आणि डॉ. अनिता बांगर, शिवाजी डोळे, डॉ. कृष्णा यादव आणि सुशील तांबे, सोनिया भट्ट, आर्चिस नेर्लीकर, महेंद्र शेवाळे, सुमित्रेंद्र श्रीवास्तव, अंकिता पारख, डॉ. अनिता नितीन जाधव, मयूर कांकरिया, नचिकेत लवाटे, जयेश विजयकुमार बाफना, प्रमोदकुमार मुर्केवार, वैष्णवी इलेक्ट्रिकसचा संघ, राहुल शहा, डॉ. गौरव गुजराती, योगेश बेदमुथा आणि मुकुंद साबू, कौशिक कोठीया, भाविक ठक्कर, डॉ.सायली पाटील जगताप, जिनेंद्र शहा, शशिकांत जाधव आणि शंतनू जाधव, वासुदेव ललवानी, हितेश बाबरिया, आतिष शहा, विपुल नेरकर, विराज शहा आणि करण शहा, तेज टकले, विजय गोसावी, योगेश वाळे आणि नितीन सोनावणे, मसूद आजादी आणि पर्ल मोतीवाला, नीलम शौकतरमाणी, सुशांत पाटील आणि राज नाहर, अंजन भालोडिया या मान्यवरांना सिंगापूर येथील द अचिव्हर्स अॅवॉर्ड २०२२ मध्ये सन्मानित करण्यात आले. दरम्यान, नाशिकच्या उद्योजकांनी हा पुरस्कार मिळाल्याबद्दल माय एफएमचे आभार व्यक्त केले आहेत.

बातम्या आणखी आहेत...