आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोनाचा धोका:पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंना कोरोनाची लागण, सोशल मीडियावर दिली माहिती; सर्वांना मास्क घालण्याचे आवाहन

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी याविषयी माहिती दिली

राज्यातील कोरोनाचा धोका सातत्याने वाढत आहे. दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पूत्र आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना कोरोनाची लागण झाली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी याविषयी माहिती दिली. तसेच संपर्कात आलेल्यांना कोरोना चाचणी करुन घेण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.

काय म्हणाले आदित्य ठाकरे?

'माझी कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी काळजी घ्यावी व चाचणी करून घ्यावी. माझी सर्वांना विनंती आहे की कायम मास्क घाला आणि आपली व आपल्या परिवाराची काळजी घ्या.' असे आवाहन आदित्य ठाकरेंनी केले आहे.

आदित्य ठाकरे पुढे म्हणाले की, सौम्य लक्षणे जाणवत असल्यामुळे मी कोरोना चाचणी करुन घेतली होती. या चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला. नागरिकांनी कोविडचे सर्व नियम काटेकोरपणे पाळावे. असे आवाहन देखील आदित्य ठाकरेंनी केले आहे.

बातम्या आणखी आहेत...