आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुंबई:कोळसा खाणी सुरू करण्यास पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांचा विरोध

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • 'आम्ही राज्यातील वन्य जीवांचे नुकसान सहन करू शकत नाही'

केंद्र सरकारच्या ताडोबा आणि अंधारी व्याघ्र प्रकल्पाजवळ कोळसा खाणी सरू करण्याच्या निर्णयाला पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी विरोध केला आहे. केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाकडून देशातील विविध भागांत कोळसा खाणींच्या लिलावाला परवानगी देण्यात आली आहे. यात या व्याघ्र प्रकल्पा जवळ असलेल्या खाणींचा समावेश आहे.

आम्ही राज्यातील वन्य जीवांचे नुकसान सहन करू शकत नाही. मी यासंदर्भात केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांना पत्र लिहिले आहे, अशी माहिती आदित्य ठाकरे यांनी ट्विटरवरून दिली आहे. यापूर्वी १९९९ आणि २०११ मध्ये झालेल्या पाहणीनंतर या भागातील खाणींच्या लिलावाला स्थगिती देण्यात आली होती. याठिकाणी खाणी सुरू झाल्यास ताडोबा आणि अंधारी पट्ट्यातील वन्यजीवन उद्ध्वस्त होईल. मग आपण पुन्हा या सगळ्या निरर्थक प्रक्रियेवर वेळ खर्च का करत आहोत, असा सवाल आदित्य यांनी उपस्थित केला. १० वर्षांपूर्वी तत्कालीन मंत्री जयराम रमेश यांनी खाण कामाला परवानगी नाकारली होती. त्यांनी या भागाचे सर्वेक्षण केले होते. या भागात खाणकाम करणे योग्य नाही, असा निष्कर्ष निघाला होता. त्यामुळे मी पुन्हा व्याघ्र प्रकल्पाचे रक्षण करण्याची विनंती करत असल्याचे ठाकर म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...