आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजागतिक दवि्यांग दिनाचे औचित्य साधून राज्यात स्वतंत्र दवि्यांग मंत्रालय स्थापन केल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनविारी केली. त्यासाठी २,०६३ पदांच्या निर्मितीसह १,१४३ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केली आहे. दवि्यांगांसाठी स्वतंत्र विभाग सुरू करणारे महाराष्ट्र पहिले राज्य असल्याचे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
या स्वतंत्र मंत्रालयासाठी सचवि दर्जाचे अधिकारी असतील. दवि्यांग बांधवांच्या कल्याणासाठी जे काही आवश्यक आहे ते सगळे हे मंत्रालय करेल. कुठलेही धोरण ठरवताना दवि्यांगांचे मत जाणून घेतले जाईल. हा निर्णय फक्त २४ दविसांत झाला आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी या वेळी सांगितले.
राज्य शासनाच्या विभागांची संख्या आता ३९ 1. राज्यात आजमितीस शासनाचे ३८ विभाग होते. प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू यांच्या आग्रही मागणीने आता दवि्यांग मंत्रालयाच्या रूपाने नव्या मंत्रालयाची भर पडली आहे. 2. फडणवीस सरकारच्या काळात शासनाचे ३७ विभाग होते. तत्कालीन भाजप खासदार नाना पटोले यांच्या आग्रहाखातर देवेंद्र फडणवीस यांनी स्वतंत्र ओबीसी मंत्रालयाची निर्मिती केली होती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.